नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी
54 हजारांची रोकड घेताना एसीबी जाळ्यात

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा


धुळे:-   पर्यवेक्षिका व कार्यालयातील अन्य सहा कर्मचार्‍यांकडून प्रवासभत्ता बिलापोटी 93 हजार 753 रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारीला 54 हजारांची रोकड स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने काल मंगळवारी रंगेहात पकडले. तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. श्रीमती शुभांगी बनसोडे (साक्री पंचायत समिती) असे लाच घेणार्‍या महिला अधिकारीचे नाव आहे.
साक्री पंचायत समिती अंतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय (पिंपळनेर) येथील तक्रारदार पर्यवेक्षिका व त्यांच्या कार्यातील अन्य सहा सहकारी यांचे प्रवास भत्त्याचे एकूण नऊ लाख 37 हजार 533 रुपयांचे एकत्रित बिल मंजूर होऊन प्रत्येकाच्या बॅक खात्यात जमा झाले. त्यानंतर महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी तकारदार व त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांना प्रवास भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून दहा टक्क्यांप्रमाणे एकूण 93 हजार रुपये जमा करुन आणून देण्यास सांगितले. अन्यथा पैसे न दिल्यास पुढील प्रवासभत्त्याची बिले काढणार नसल्याची तंबी दिली. त्यामुळे तकारदाराने 6 मेस धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तकार दिली. त्या अनुषंगाने तक्रारीची खातरजमा केली. श्रीमती बनसोडे यांनी पंचासमक्ष तकारदार याच्याकडे सर्व कर्मचार्‍यांच्या प्रवासभत्ता बिलाच्या दहा टक्क्यांप्रमाणे 93 हजार 753 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. प्रवासभत्ता जमा झालेल्या काही कर्मचार्‍यांकडून तकारदाराने प्रवासभत्त्याच्या बिलाप्रमाणे दहा टक्क्याच्या हिशेबानुसार 54 हजार रुपये जमा करुन ही रक्कम काल मंगळवारी पिंपळनेर महिला बालकल्याण केंद्र कार्यालयात श्रीमती बनसोडे यांना पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. तिच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, हेमंत बेंडाळे, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागूल, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगूजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:30 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!