DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- बारावी माध्यमिक बोर्डाद्वारे आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात राष्ट्रीय कनिष्ठ विद्यालयाची कु. हिमांशी राजेश्वर तिवाडे 70.67 % गुण मिळवून विज्ञान शाखेमधून तर भि.एज्यू.सो. ज्यू. कॉलेजची कु. गौरी मधुकर हेडाऊ ही 75.17 % गुण मिळवून कला शाखेतून प्रथम आली.
वाणिज्य शाखेमधून भिवापूर महाविद्यालयाची कु. सपना रामूजी पिंपळकर प्रथम आली तिला 77 % गुण प्राप्त झाले. भि.एज्यू.सो. ज्यू. कॉलेज एमसीव्हीसी मधून अक्षय सुधाकर अलबनकर 73.50% (auto) घेत प्रथम आला. सुमित मालोदे 68.83% घेऊन दुसरा तर तुषार चौधरी 68.33% घेत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
बीईएस इंग्लिश मिडीयम शाळा व ज्यू. कॉलेजची कु. तरण्णूम तौफिक शेख ही 70.50% गुण मिळवून विज्ञान शाखेमधून दुसरी, तर राष्ट्रीय विद्यालयाचा मंथम इलमकर 68.83% गुण घेऊन तिसरा आला. राष्ट्रीय विद्यालयाची कु. आकांक्षा खंडाळ 74% गुण मिळवून कला शाखेतून दुसरी तर भि.एज्यू.सो. ज्यू. कॉलेजची कु. श्रुती श्रीरामे 68.83% गुण घेऊन तिसरी आली. वाणिज्य शाखेतुन भिवापूर कनिष्ठ महाविद्यालयाची कु. दीपाली कावळे 76.33% गुण घेऊन दुसरी तर श्रेया गिरी 70.50% गुण घेत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
—> भिवापूर कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 98.24%, कला शाखेचा 67.69% तर वाणिज्य शाखेचा निकाल 95.91% लागला. भि.एज्यू.सो. ज्यू. कॉलेजचा कला शाखेचा निकाल 82.75% तर एमसीव्हीसीचा निकाल 73.43% एवढा लागला.



