DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी- निवास गागडे
कोल्हापूर:- इचलकरंजी येथील स्पूर्ती कॉर्नर ढोले पाणंद गावभाग शुभम रमेश पाटील यांच्या घरासमोर हा प्रकार सायंकाळी घडला.
शुभम पाटील चे काका महादेव शंकर पाटील यांनी शिवाजी शंकर ढोले यांना तुम्ही रस्त्यावर हत्ती गवत लावू नका.असे सांगितल्याने या गोष्टीचा राग मनात धरून शिवाजी शंकर ढोले यांनी महादेव शंकर पाटील यांच्याशी वाद घालून मुलगा सौरभ शिवाजी ढोले यास फोन वरून बोलावले असता तो त्याचा मित्र अविनाश पडियार व इतर तिघे यांना घेवून येवून शुभम रमेश पाटील यांचे काका महादेव शंकर पाटील यांच्या अंगावर गेले असता शुभम रमेश पाटील हे सोडविण्यासाठी गेले असता त्याच्या मानेवर वार केला असता तो वार चुकवून हात मध्ये घातला असता तो वार त्याच्या डावे हाताचे अंगठ्यावर लागला असून सौरभ शिवाजी ढोले याने शुभम व त्याचे काका महादेव यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याचे वडील शिवाजी शंकर ढोले मित्र अविनाश पडियार व इतर तिघांच्यावर व वापरण्यात आलेले हत्यार हस्तगत करून कलम ३०८/२४५/५७३/४११/४९५/१६७/३४१/४५१ ३८/२२ प्रमाणे आरोपींचे वर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.