नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पिंपळनेर पोलीसांची धडक कारवाई; दुचाकी चोरांची टोळी पकडून ६ मोटारसायकली हस्तगत करण्यात मोठे यश.

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री:- मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सो, यांनी धुळे जिल्हयात इतर पोलीस ठाणे हददीतुन दुचाकी वाहने चोरीचे प्रकार होत असल्याने प्रतिबंध होणेसाठी प्रभावी उपाययोजना आखुन कारवाई व्हावी विशेष सुचना दिल्या असल्यानं अपर पोलीस अधिक्षक, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाणे परिसरात पोलीस शोध पथक कार्यान्वीत करण्यात आले होते.

दिनांक. ०१/०६/२०२४ रोजी तक्रारदार सतिष लक्ष्मण गांगुर्डे रा. पिंपळनेर यांनी त्याचे ताब्यातील मो सा क्रं. एमएच२८ वी क्यू २६५५ युनीकॉन काळया रंगाची हि राहते घराच्या समोरुन दिनांक ३०/०५/२०२४ रोजीचे सायंकाळी ७.०० ते दिनांक ३१/०५/२०२४ रोजीचे सकाळी ०६.०० वा दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने मोटार सायकल चोरुन नेल्याची तक्रार दिले वरुन पिंपळनेर पो स्टे येथे सीसीटीएनएस गुरनं. १६०/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक ०१/०६/२०२४ रोजी दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास असई / अशोक पवार ह करीत आहेत.

दरम्यान तपास अंमलदार असई/अशोक पवार यांना मो.सा. चोरी बाबत मध्यप्रदेश खेतीया येथील राहणारा अल्केश अशोक जाधव या इसमांबावत माहिती मिळाली होती. सदर माहीतीची पुष्टी करणेसाठी सपोनि/सचिन कापडणीस यांनी सुत्रे हाती घेतली वरिष्ठांना माहीती देवून दिलेल्या सुचना नुसार पथक तयार करुन शोध दरम्यान मो.सा. चोर ९. अल्केश अशोक जाधव रा. खेतीया वयताकवाडी, मध्यप्रदेश यास मो सा क्रं. एमएच१८ बी क्यु २६५५ युनीकॉन सह शिताफिने ताब्यात घेतले. सदर चोरास विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार नामे २) मोहीत चंद्रकात पाटील रा. गांधीचौक पिंपळनेर ता साक्री ३) कल्पेश दिपक चौधरी रा हरीओम नगर पिंपळनेर ता साक्री याचे सोबत दिनांक. ३९/०५/२०२४ रोजी पिंपळनेर गावातुन पाटील गल्ली येथुन तक्रारदार यांचे घराचे समोरुन चोरली अशी कबुली दिली.

तसेच पिंपळनेर शहरातुन व इतर ठिकाणावरुन घराचे समोर लावलेल्या इतर मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली जवळपास ६ मो.सा. चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यावरुन आरोपी १)अल्केश अशोक जाधव रा. खेतीया वयताकवाडी, मध्यप्रदेश २) मोहीत चंद्रकात पाटील रा. गांधीचौक पिंपळनेर ता साक्री ३) कल्पेश दिपक चौधरी रा. हरीओम नगर पिंपळनेर ता‌. साक्री जि. धुळे अशांना अटक केली आहे. आरोपीतांकडुन ६ चोरीस गेलेल्या मो. सा. हस्तगत केल्या आहेत. पिंपळनेर पोलीसांचा अधिक तपास सुरु आहे. आणखी मो. सा. चोरीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गुन्हयातील तक्रारदार मजुरीकाम करीत असल्याने चोरट्यांनी चोरुन नेलेल्या मोटार सायकली पोलीसांकरवी मिळुन आल्याने आंनद व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले आहेत. तरी नागरीकांना आव्हान आहे की, आपण पिंपळनेर पोलीस ठाणेत येवून कागदपत्रासह मोटार सायकलीची खात्री करवून घ्यावी. तसेच कागदपत्राची खात्री केल्याशिवाय कमी किंमतीत मिळत असलेली मो.सा. परस्पर विकत घेवु नये.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक  श्रीकांत धिवरे सो, मा. अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस, पोसई/विजय चौरे, असई/ईश्वर शिरसाठ, असई /अशोक पवार, पोहेकों/प्रकाश मालचे, पोकों/प्रविण धनगर, पोकों/हेमंत पाटोळे, पोकों/ रविंद्र सुर्यवंशी, पोकों/दिनेश माळी, पोकों / धिरज गवते, पोकों/योगेश महाले अशांचा सहभाग आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:31 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!