नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ती तक्रार खोटी व दिशाभूल करणारी -सरपंच तिवाडे

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले


भिवापूर :- भिवापूर (ता.प्र.) गट ग्राम पंचायत मानोरा (खैरगाव) येथे दलित वस्ती अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये नालीचे बांधकाम करण्यात आले.नालीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारांला कामाची रक्कम अदा करण्यात आली. ग्रा.पं. सदस्य मिथुन माटे यांनी या संबंधीची खोटी तक्रार गट विकास अधिकारी यांचेकडे करून ग्राम पंचायतीची बदनामी केली अशी माहिती सरपंच व सदस्यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
    गट ग्राम पंचायत मानोरा येथे दलित वस्ती अंतर्गत ४लक्ष रुपयाचे नाली बांधकाम मंजूर झाले होते.व याबांधकामाची एमबी व सीसी  कामाच्या प्राकलना नुसार ९० टक्के रक्कम कंत्राटदाराला देण्यात आली. तसेच दलित वस्तीचा निधी हा ग्राम सचिव व गटविकास अधिकारी यांचे स्वाक्षरी ने काढला जातो. असे असतांना माटे यांनी खोटी व दिशाभूल करणारी माहिती देवून सरपंचाची बदनामी केली आहे.
खैरगाव येथे स्मशानभूमीकडे जाणाऱा सिमेंट रस्ता मंजूर झाला होता. त्या रस्त्याचे बांधकाम झाले असून; रस्त्यांच्या दुतर्फा मुरुम टाकण्यात आला आहे. केवळ राजकीय हेतूने प्रेरित होउन विरोधास विरोध करण्यासाठी बिनबुडाची तक्रार माटे यांनी केली आहे.
     ग्राम पंचायत सदस्य असतांनाही माटे हे मासिक सभेत महिला सदस्यांच्या उपस्थितीत असभ्य भाषेचा वापर करतात त्यामुळे त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई झालीच पाहिजे याकरिता आम्ही वरिष्ठांकडे  तक्रार करणार असल्याचे ग्रा.पं.सदस्या शिल्पा गुडघे, सपना
लुटे, लेनेश्वरी मेश्राम यांनी पत्र परिषदेत सांगितले.
    ग्राम पंचायत सदस्य या नात्याने गावातील समस्या अडीअडचणी दूर करने हे सदस्याचे कर्तव्य असते. परंतू मिथुन माटे विकास कामांना विरोध करुन राजकारण करतात. नागरिकांना तसेच वरिष्ठांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती देवून कामात अडथळा निर्माण करतात.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!