नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भगिनींसह, शेतकरी व युवकांना बळ देणारा अर्थ संकल्प – माजी आ. राजू पारवे

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनील मैदिले

उमरेड :- महायुती सरकारने नुकताच सादर केलेला शेवटचा अर्थ संकल्प हा अभूतपूर्व असून यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारखी ऐतिहासिक योजना असून त्यामुळे महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी मोठा हातभार लागेल तसेच शेतकरी बंधू व युवकांनाही बळ देणारा अर्थ संकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार राजू पारवे यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेद्वारे २१ ते ६० या वयोगटातील पात्र महिला भगिनींना प्रति महिना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे तसेच अन्नपूर्णा योजनेतून पात्र कुटुंबास वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. निवडक सतरा शहरातील मिळून एकूण दहा हजार भगिनींना पिंक इ रिक्षा घेण्यासाठी अर्थ सहाय्य देण्याची तरतूद या अर्थ संकल्पात असून स्त्री सक्षमीकरणासाठी हे ऐतिहासिक पाऊल आहे.
शेतकऱ्यांना थकीत वीज बील माफ करण्यासह हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्याची घोषणा करून सरकार शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील असल्याचे या अर्थ संकल्पाने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेद्वारे युवकांच्या हिताचा निर्णय या अर्थ संकल्पात झाला असून एकूणच युवती, युवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, विवाहित, विधवा, दिव्यांग, वृद्ध, सैनिक, पोलीस, नोकरदार,उद्योजक अशा समाजातील सर्वच घटकांना या अर्थसंकल्पातून भरीव मदत, अनुदान व न्याय देण्यात आल्याचे मत माजी आमदार राजू पारवे यांनी व्यक्त केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:08 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!