नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

विटा पोलिसांनी केली १० लाखाची २४० गांजा झाडे जप्त, एकाला अटक

DPT NEWS NETWORK

प्रतिनिधी :- रविंद्र पवार


विटा:- रेणावी (ता.खानापूर) येथे एका शेतात छापा टाकून विटा पोलीसांनी सुमारे १० लाख रूपये मूल्याची  २४० गांजाची झाडे जप्त केली. आज मध्यरात्री पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये  १०० किलो गांजा जप्त करून शेतमालकाला ताब्यात घेतले आहे. विटा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलीसांना  रेणावी येथे शेतात गांजा लागवड केली असल्याची माहिती मिळाली.
पोलीसांच्या पथकाने पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे राजाराम आनंदा गुजले (वय ५०, रा. रेणावी) यांच्या शेतात छापा टाकला. तर उसाच्या  फडात तीन ते पाच फूट उंचीची  २४० गांजाची झाडे आढळून आली. याचे वजन  १०० किलो  ७०० ग्रॅम असून त्याचे बाजारातील मूल्य १० लाख ७ हजार रूपये आहे. सदर गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून शेतमालक गुजले याला ताब्यात घेउन त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई विटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपनिरीक्षक विशाल येळेकर, किरण खाडे, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, विलास मोहिते आदींच्या पथकाने केली.. तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि शरद मेमाणे हे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!