DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी:- रीजवान खाटीक
शहादा: गुजरात राज्यातील निझर येथील कुमार छात्रालयात नंदुरबार तळोदा शहादा निझर कुकरमुंडा परिसरातील दोडे गुजर समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 7 जुलै रविवारी सकाळी नऊ वाजता समाजातील विविध विषयांवर आयोजन केले असून विविध विषयांवर विचारविनिमय करण्यासंदर्भात समाज बंधू आणि भगिनींनी उपस्थितीचे आवाहन दोडेगुजर समाजाचे अध्यक्ष डायाभाई चौधरी यांनी केले आहे
गुजरात राज्यातील निझर येथील कुमार छात्रलयाच्या सभागृहात दिनांक सात जुलै रविवारी सकाळी नऊ वाजता दोडे गुजर समाज संस्थांनच्या वतीने नंदुरबार तळोदा शहादा निझर कुकरमुंडा परिसरातील दोडे गुजर समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले असून सभेच्या अध्यक्षस्थानी दोडे गुजर समाजाचे अध्यक्ष डायाभाई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असून सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून त्यात मागील वार्षिक साधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे संस्थेच्या सण २०२३ व २०२४ पर्यंतचा जमाखर्च तेरी ताळेबंद वाचून खर्चास मंजुरी घेणे बाबत तसेच माननीय अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यासंदर्भात सभेचे आयोजन केले आहे तसेच समाजातील ज्येष्ठ व युवा युवती भगिनींनी विशेष उपस्थितीत राहावे तसेच समाजाकडून काही सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात सभेपूर्वी अध्यक्षांकडे सुपूर्त कराव्यात तसेच सभेमध्ये येताना वार्षिक सभासद फी सचिवांकडे जमा करावी असे आवाहन अध्यक्ष डायाभाई चौधरी उपाध्यक्ष रघुवीर चौधरी सचिव ज्ञानेश्वर पटेल संस्थांनचे विश्वस्त यशवंत पटेल सुभाष पटेल दिलीप पाटील अरुण पाटील नटवर पटेल योगेश पाटील योगेश चव्हाण भूषण चव्हाण आदींनी मोठ्या संख्येने समाजाचे बंधू आणि भगिनींनी उपस्थितीत रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.