नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कबनूरचा ग्रामविकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

9 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे

कोल्हापूर :- कबनूर येथील ग्रामविकास अधिकारीला 9 हजार रुपयांची लाच घेताना लाचलूूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गणपत धनाजी आदलींग (वय- 57 वर्षे, ग्रामविकास अधिकारी, कबनुर, ता.  हातकणंगले, वर्ग- 3, रा.कृष्णतारा अपार्टमेंट, प्लॅट नंबर 2, मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर), असे लाच घेणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.


तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असुन त्यांनी मौजे कबनुर, ता. हातकणंगले गावातील वॉर्ड नंबर 2 मधील वाढीव पाईप लाईन बसवण्यासाठीच्या कामाची नियमाप्रमाणे निविदा भरलेली आहे. सदर भरलेले निविधाप्रमाणे कामाबाबत विचारणा करण्यासाठी तक्रारदार ग्रामविकास अधिकारी आदलिंग यांना भेटले असता आदलींग यांनी तक्रारदार यांना कामाची वर्क ऑर्डर दण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे 9 हजाराची मागणी केली. या लाचेविरुद्ध तक्रारदारांनी कोल्हापूर लाचलूूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.  कोल्हापूर एसीबीने सापळा रचला आणि मागणी केल्याप्रमाणे ग्रामविकास अधिकारी आदलिंग यांनी तक्रारदारकडून 9 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. दरम्यान आरोपी आदलींग विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पुणे लाचलूूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे,  अपर अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर लाचलूूचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक बापु साळुंके,  हवालदार विकास माने,  सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार यांनी ही यशस्वी कामगिरी केली.

दरम्यान,  कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. तसेच तक्रार दिल्याने आपलं कोणतेही शासकीय काम थांबत नाही, असे आवाहन बापु साळुंके
(पोलीस निरीक्षक,अतिरिक्त कार्यभार पोलीस उप अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर मो.नं. 7304769230, (कार्यालयीन क्रमांक/0231- 2540989)
कोल्हापूर. कार्यालय मेल आयडी(dyspacbkolapur@gmail.com) यावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता.
टोल फ्रि क्रं. 1064(आपण दिलेल्या तक्रारीबाबत आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल.) यांनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:34 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!