नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निजामपूर पोलिसांची दमदार कामगिरी; सुरतच्या भंगार व्यवसायिकास लुटणारे दोघांना अवघ्या दोन तासात केले गजाआड.

फोटो: निजामपूर येथे गुन्ह्यातील संशयीत आरोपी समवेत पोलिस पथक

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री :- जामदे ता.साक्री जि. धुळे येथे काही दरोडेखोरांनी सुरतच्या एका भंगार व्यवसायिकासह अन्य दोघांना सुमारे 300 टन भंगार असल्याचे गावात बोलवून त्यांना मारहाण करीत पैसे लुटल्याची घटना घडली होती.निजामपूर पोलीसांनी अवघे दोन तासात लुटीच्या घटनेतील दोघे संशयितांना जेरबंद केले.
        सुरत येथील भंगार व्यवसायिक पुनीत शर्मा व सोबत असलेले दोघांना 300 टन भंगार असल्याचे सांगून तीन ते चार दरोडेखोरांनी जामदे ता.साक्री जि.धुळे गावात बोलविले तसेच त्यांना जंगलात घेवून दोरीने बांधून जबर मारहाण करीत त्यांचेकडील असलेले पैसे व सोने बळजबरीने हिसकावून लुट केली.
      सदर घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांच्यासह शोधपथकाने लुटीच्या गुन्ह्याचा तांत्रिक पध्दतीने उलगडा करीत संशयित रोहित अमीर चव्हाण (वय32) रा.जामदे,ता.साक्री) भुऱ्या निला भोसले (वय32) रा.जामदे ता.साक्री) या दोघांना ताब्यात घेत विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.इतर आरोपीतांचा पोलीस शोध घेत आहेत.
      ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाणेचे प्रभारी मयुर भामरे,उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे,विशाल पाटील, पोहेकॉ माळचे,अहिरे, शिंदे,पवार,चालक देवरे यांनी केली आहे.
         या घटनेतील इतर संशयितांचा शोध पोलीस घेत आहे.याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सोनवणे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:53 am, January 13, 2025
temperature icon 22°C
साफ आकाश
Humidity 42 %
Wind 6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!