DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- निफाड संजय जाधव
नाशिक:- निफाड येथे निफाड तहसील कार्यालय, निफाड पोलीस स्टेशन, निफाड नगरपंचायत, उपजिल्हा रुग्णालय, तसेच श्री माणकेश्वर वाचनालय आदि ठिकाणी भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
निफाड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील भामरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून तहसीलदार विशाल नाईकवाडे तसेच दिपाली खेडकर आदी पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तर निफाड नगरपंचायत च्या प्रांगणात नगराध्यक्षा डॉ. कविता धारराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी उपनगराध्यक्ष अनिल पा. कुंदे ,मुख्याधिकारी अमोल चौधरी, सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच अधिकारी कर्मचारी व नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच उपविभागीय कार्यालयात निफाड चे पोलीस उपअधीक्षक निलेश पालवे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, असून निफाड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, ईश्वर पाटील, निकम ,राजेंद्र बाविस्कर, पोलीस राजू मनोहर, नितीन सांगळे, राजेंद्र दरोडे, भारत पवार, सुनील सानप, आदी उपस्थित होते तसेच श्री. माणकेश्वर वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून यावेळी उपाध्यक्ष डॉ. मेघा जंगम, दत्ता काका उगावकर, संचालक तनवीर राजे, सुहास सुरळीकर, राजेंद्र खालकर, बाळासाहेब कर्डिले, नईमखान पठाण, प्रवीण तरुण पुरे रोहिणी शेळके संजय घुमरे नितीन बनसोडे विद्या बेंद्रे, अनिता कांबळे वाचनालयाचे सर्व पदाधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. निफाड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात डॉ. राजीव तांभाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून याप्रसंगी डॉ. लाड, डॉ. बोराडे, डॉ. पोटे, डॉ. योगिता कुटे, डॉ. संकेत आहेर, नितीन परदेशी, मेट्रेन आदी परिचारिका, तांत्रिक कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, नर्सिंग कॉलेजचे मुलं मुली उपस्थित होते,