नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शाळेचे ऋण फेडण्याचा अल्प प्रयत्न -जितेंद्र जैन- बंब

DPT NEWS NETWORK 🗞️✍️

बोरकुंड:- धुळे जिल्ह्यातील बोरकुंड शाळेत शिकणारा विद्यार्थी जितेंद्र बंब यांचा शाळेचे ऋण फेडण्याचा आगळावेगळा प्रयत्न. ते म्हणतात ज्या शाळेत मी माध्यमिक शिक्षण घेतले, ज्या शाळेने मला जगण्याची नैतिक मूल्य शिकवली, त्या शाळेच्या आणि शिक्षकाच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. पण शाळेला माझ्या परीने वीस हजाराची देणगी देवून शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्प प्रयत्न केला आहे, अशा भावना आज भाजपा प्रदेश महामंत्री राज. प्रकोस्ठ जितेंद्र जैन बंब यांनी केले.


     स्वातंत्र्य सैनिक ओंकार नारायण पाटील माध्यमिक विद्यालय बोरकुंड या संस्थेला जितेंद्र जैन बंब यांनी देणगी दिली त्या प्रसंगी त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
     बोरकुंड येथील स्वातंत्र्य सैनिक ओंकार नारायण पाटील माध्यमिक विद्यालयाला विद्यार्थ्यांच्या कपड्यांसाठी काही पैसे कमी पडत असल्याची बाब जितेंद्र जैन बंब यांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी शिक्षकांना स्वतःहून बोलावून वीस हजाराची देणगी दिली. या शाळेत माझे माध्यमिक शिक्षण झाले असल्याने मला माझे मोठे वडील, गुरुवर्य नथमल जसराज जैन उर्फ नत्थु भावसा यांच्या स्मरणार्थ व आई वडिलांच्या प्रेरणेने शाळेला देणगी देताना मनापासून आनंद होत आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना भाजपाचे बोरकुंड येथील जुने-जानते कार्यकर्ते आप्पासाहेब राजेंद्र डीगंबर पाटील यांनीही सहकार्य केले .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!