नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

संतोष आठवले यांना राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार प्रदान

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे

कोलहापुर:- पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले यांना राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले .
कोल्हापुर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पुणे न्युज एक्सप्रेस च्या वतीने ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुणे न्युज एक्सप्रेसचे संपादक मेहबुब सर्जेखान होते .
सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात आपण करीत असलेल्या निस्वार्थी समाजसेवा मोलाची भर घालणारी आहे. विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये रुजवत आहात. राज्यघटनेची समता व बंधुता ही तत्वे प्रमाणभूत मानून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ या गुणांचा आणि निष्ठावंत जागरूक नागरिक म्हणून आपण कार्यान्वित आहात. आपले हे कर्तृत्व अत्यंत अभिनंदन आणि अनुकरणी आहे. समाजासाठी तुम्ही एक प्रेरक शक्ती आहे. त्याकरता आम्ही या राष्ट्रीय कार्यक्रमाचे औचित्य साधून एक छोटासा पण जिव्हाळ्याचा व आपुलकीचा सन्मान करीत असल्याचे सन्मानपत्र त्यांना देण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पँथर आर्मी चे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर, ध्यानसंवाद वृत्तपत्राचे ज्येष्ट संपादक सागर बोराडे, घर प्रमुख चे संपादक धोंडीराम शिंदे, प्रगत हिंदुस्थान चे संपादक दिपक ढवळे, विरभ्रद अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे संस्थापक चेअरमन संतोष जंगम,  श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत सौ प्रमोदिनी माने यांनी केले तर आभार मुरलीधर कांबळे यांनी मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:40 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!