नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जेके शाह महाविद्यालयाचा रक्षाबंधन उपक्रम

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले


निजामपूर – भारतीय सण उत्सवांची परंपरा म्हणजे सामाजिक एकोपा आणि सामाजिक संस्कार जपण्याची परंपरा आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव यांनी केले निजामपूर जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाचे जगन्नाथ कडवादास शाह आदर्श महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विकास व युवती सभा या एककांच्या माध्यमातून रक्षाबंधन या भारतीय संस्कृतीतील उत्सवाचा विद्यार्थिनींनी निजामपूर येथील पोलीस स्टेशन येथे पोलीस ठाणे अंमलदार मोरे साहेब त्याचप्रमाणे उपस्थित कलिम शेख आदी मान्यवरांसह पोलीस स्टेशनला महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जाधव अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचारी बांधवांना स्वयंसेविकांनी राख्या बांधल्या आणि त्या पोलीस बांधवांनी आनंदाने स्वीकारल्या व ओवाळणी देखील दिली. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले रक्षाबंधन केवळ सामाजिक बांधिलकीचा भाग नाही तर आपण सर्व समाजाची रक्षा कार्य तत्परतेने करतात. त्यामुळे आपल्याला या भगिनींनी आपले कर्तव्याबद्दल आपल्याला राखीच्या रूपाने आपल्याकडून या सेवेच्या कार्यासाठी आपण नेहमी बंधनात असतात. त्यासाठी आपल्याला रक्षा सूत्र बांधले आहे. त्याच्यासोबत या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट एसटी महामंडळाच्या ड्रायव्हर, कंडक्टर बंधू यांनाही रक्षाबंधन केले. कार्यक्रमाच्या या आयोजनासाठी महाविद्यालयातील मनीषा जाधव आणि 22 विद्यार्थिनींच्या ग्रुपने परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अजबराव इंगळे, डॉ. यशवंत कुलकर्णी आणि महाविद्यालयातील डॉ. रवींद्र ठाकरे, डॉ. कांतीलाल सोनवणे डॉ. विजय भामरे आदी प्राध्यापक बंधूंनी बहुमोल सहकार्य केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:59 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!