नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गणेश उत्सव निमित्त भक्तांनी व कार्यकर्त्यांनी केले रक्तदान

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले

निजामपूर :- साक्री तालुक्यातील जैताणे येथील संघ शक्ती व्यायाम शाळा गणेश मित्र मंडळ व जनकल्याण रक्तपेढी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सव निमित्त रक्तदान शिबिर घेतले. 95 रक्त दांत्यानी रक्त दान करून राष्ट्रीय उपक्रमाला सहकार्य करत सामाजिक बांधिलकी ठेवत या संघशक्ती व्यायम शाळा गणेश मित्र मंडळ ने सेवेसाठी शिबिरात 95 दात्यांनी रक्तदान केले. तसेच रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी सरपंच संजय खैरनार, शिवसेनेचे जेष्ठ नेते प्रकाश पाटिल, समता परिषद चे राजेश बागूल, डाॅ. अर्जुन लालचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. 

रक्तदान करताना मंडळ कार्यकर्ते

   संघशक्ती व्यायम शाळा गणेश मित्र मंडळ, जयशिवाजी व्यायम शाळा मित्र मंडळ, गजानन गणेश मित्र मंडळ, महात्मा फुले गणेश मित्र मंडळ, महात्मा फुले व्यायम शाळा गणेश मित्र परिसरातील तरूणांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन सामाजिक कार्य पार पाडले. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक मयुर भामरे यांनी देखील रक्तदानास सहभाग नोंदवला 95 रक्तदान करणार्या मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन केले अध्यक्ष राकेश शेवाळे, उपध्यक्ष समाधान महाले, चेतण भदाणे,धनराज जाधव, कमलेश भामरे, सुरेश सोनवणे, किरण सावंत, दशरथ सोनवणे, नवल खैरनार, सदा महाजन, चेतन खैरनार, गणेश देवरे, भोलेनाथ जगताप, अकित सोनवणे, राहुल गोसावी, नंदु जाधव, लक्ष्मण सोनवणे, किशोर जाधव, लालु देवरे, मेघराज पैठणकर, बन्टी जाधव, हरिष जाधव आदि सभासद तसेच जनकल्याण रक्तपेढीतील डॉ.अर्जुन लालचंदानी, अशोक पवार, हेमंत महाले, शेखर पाटिल, युवराज ऐडाईत, सागर नरवाडे,संजय सुर्यवंशी, तेजस पाटील आदिनी परिश्रम घेतले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:45 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!