नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

देऊरचे नवदाम्पत्य अपघातात ठार पुण्यात डंपरने उडविले; गावावर शोककळा

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ तालुका प्रतिनिधी:- संकेत बागरेचा

धुळे :- मुळचे देऊर गावाचे रहिवासी व सध्या नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास असलेले नवदाम्पत्य अपघातात ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. गणपती पाहून दुचाकीने घरी जात असताना डंपरने धडक दिल्याने दोघे डंपरच्या चाकाखाली आले. परिणामी, दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती आज सकाळी देऊर गावात वाऱ्यासारखी पसरली अन् संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. दरम्यान, आज गुरुवारी सायंकाळी दोघांचे मृतदेह देऊर गावात आणले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊर गावातील रहिवासी अनिल काळू सूर्यवंशी (२७) यांचा आठ महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. ते पुण्यातील एका कंपनीत नोकरीला असल्याने त्यांनी पुण्यापासून जवळच असलेल्या पिरंगुट येथे घर घेतले होते. तेथे अनिल सूर्यवंशी व त्यांची पत्नी सौ. प्रियंका सूर्यवंशी हे दोघे वास्तव्यास होते. काल रात्री बुधवारी ते दुचाकीने गणपती दर्शनासाठी गेले होते.

घरातील कर्ता मुलगा गेला!
मयत अनिल सूर्यवंशी यांना दोन बहिणी असून मोठ्या बहिणीचा विवाह झाला आहे. तर लहान बहिण पुण्यातच डिझायनरचे शिक्षण घेत आहे. तर वडील काळू सूर्यवंशी हे गावात शेती करतात. घरात अनिल हा एकटा मुलगा असल्याने ते सर्वांचा आधार होते. कमविता मुलगा म्हणून ते सर्व जबाबदारी नेटाने पार पाडत होते. परंतु त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने सूर्यवंशी कुटूंबाबर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनिल हे गावात सर्वांशी मिळून मिसळून व आपुलकीने वागत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मित्र परिवारही सून्न झाला आहे.
रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे मृतदेह देऊर गावाकडे रवाना करण्यात आले. सायंकाळी ६-७ वाजेपर्यंत त्यांचे मृतदेह देऊर येथे आणल्यानंतर रात्रीच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पुण्यात गणपती पाहायला सोबत अनिल यांची लहान बहिण देखील होती. गणपती दर्शनानंतर ते रात्री घरीयायला निघाले. वाटेत कोथरुडला बहिणीला सोडले. त्यानंतर अनिल व सौ. प्रिया सूर्यवंशी हे दोघे दुचाकीने घराकडे जायला निघाले. घर अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असताना भुगाव येथील गारवा हॉटेलजवळ एका डंपरने समोरुन त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघे खाली पडून डंपरच्या चाकाखाली आले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती देऊर गावात वाऱ्यासारखी पसरली. या दुर्दैवी घटनेने गावात सुन्न झाले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:11 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!