DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- गोकुळ नगराळे
साक्री:- दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी
साक्री तालुका वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा व बैठक संपन्न झाली. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या आदेशान्वये साक्री तालुका वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा दिनांक 6 सप्टेंबर सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह साक्री येथे मोठ्या संख्येने व उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी येणाऱ्या साक्री विधानसभा निवडणुकीत वंचित स्वबळावर आपला उमेदवार देणार व मोठ्या ताकदीने ही निवडणूक लढविणार व त्यासाठी सर्वांनी कामाला लागा असा आदेश जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, उत्तर महाराष्ट्र उपअध्यक्ष आबासाहेब, जिल्हाध्यक्ष सिताराम वाघ, तालुका अध्यक्ष नितीन मोहिते यांनी उपस्थित वंचित चे सर्व तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी कार्यकर्ते व शाखाध्यक्ष यांना करण्यात आले तसेच याप्रसंगी साक्री तालुका वंचित बहुजन आघाडी पक्षाची नवीन कार्यकारणी जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्र व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात तालुका अध्यक्षपदी नितीन मोहिते, उपाध्यक्ष भाऊसाहेब वाघ किरण अहिरे, शिवाजी मालचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट सुशील अहिरे एडवोकेट कृष्णा सूर्यवंशी महासचिव विजय हिरे, सचिन शशिकांत वाघ, संघटक गोकुळ नगराळे, दर्शन बर्डे, सदस्य अजय वाघ,लक्ष्मीकांत पिंपळे, चेतन गवळे राहुल बोरसे, दिनेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी तालुक्यातील वंचित चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते त्यात अरविंद निकम आबासाहेब खैरनार सिताराम वाघ रवी जाधव नितीन मोहिते शरद वाघ आरडी साळवे लताबाई थोरात अक्काबाई ब्राह्मणे दीपक वाघ सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



