DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी- संजय जाधव निफाड
नाशिक :- निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील विवाहित महिला शितल लक्ष्मण ठाकरे वय 29 ही नांदुर्डी येथे बहिणीकडे आली असता मी सासरी जाते असे सांगून घरातून निघून गेली असून अद्याप पर्यंत ती पिंपळगाव येथे पोहोचली नाही. अशी माहिती त्यांची बहीण उषा दौलत मध्ये रा. नांदुर्डी ता. निफाड यांनी निफाड पोलीस स्टेशनला दिली आहे.
शितल लक्ष्मण ठाकरे वय 29 ह्या रंगाने गोऱ्या असून केस काळे कुरळे आहेत, उंची पाच फूट असून चेहरा उभा आहे. सदर महिलेच्या उजव्या हातावर मोराच्या पिसाचे गोंधनअसून डाव्या हातावर इंग्रजीमध्ये लक्ष्मण असे नाव गोंदलेले आहे अंगात पंजाबी ड्रेस असून कुणाच्या नजरेस पडल्यास निफाड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली एस सी घोलप हे करीत आहे.