नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कुलस्वामिनी श्री.धनदाई माता दिंडी पद यात्रेचे शेवाळीत आगमन होवून म्हसदीकडे प्रस्थान.

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री: साक्री तालुक्यातील इंदवे गावातील भाविक विशेषतः देवरे परिवार मागील १ वर्षापासून म्हसदी येथील कुलस्वामिनी धनदाई मातेचे दर्शन घेण्यासाठी दिंडी सोहळा पद यात्रा काढीत आहेत.
नवरात्री उत्सवात म्हसदी येथील कुलदैवत श्री धनदाई मातेच्या दरवर्षी एका विशिष्ट तिथिस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवीचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग अथवा भजने गात,नामस्मरण करीत पायी  दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात येते त्या प्रमाणे आज दि ९ ऑक्टोंबर बुधवारी रोजी सकाळी ६वाजेपासून इंदवे या गावापासून दिंडी सोहळा पद यात्रेला सुरुवात झाली.सर्व प्रथम इंदवे गावातील इंदा देवी यांना मान देवून त्यांची पुजा अर्चना करीत पायी दिंडी सोहळाला सुरूवात झाली.इंदवे ते म्हसदी अंतर सुमारे ४६ कि.मी आहे. पुढे इंदवे गावापासून दुसाने, होडदाणे, रायपूर, कंळभिर गाव करीत सायंकाळी ०५:३० वाजेच्या सुमारास शेवाळी(दातर्ती) गावात  आगमन झाले.गावातील गावकऱ्यांच्या हस्ते कुलस्वामिनी श्री धनदाई मातेच्या दिंडी ची आरती करण्यात आली.डफ वाजवीत महीला भगिनी मातेच्या गरबा संगीतावर नृत्य करीत होत्या व तसेच गावातील भजनी मंडळाच्या वतीने भजन सादर करून परिसरातील वातावरण भक्तिमय केले .गावात भाविकांच्या पायी दिंडी यात्रेच्या पद स्पर्शा ने वरुण राजाने ही हजेरी लावून स्वागत केले .शेवाळी गावातील ग्रामस्थांच्यावतीने पायी दिंडी यात्रेतील भविकांकासाठी रात्री मुक्कामी राहण्याची व्यवस्था गावातील शिवाजी माध्यमिक विद्यालयात कऱण्यात आली होती व तसेच भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली होती. पायी दिंडी यात्रेतील भाविक दुसऱ्या दिवशी म्हसदी येथील कुलस्वामिनी धनदाई मातेच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत अशी माहिती शेवाळी गावाचे ग्रामसुधार मंडळाचे सचिव सुरेश साळुंके यांनी दिली या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!