नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तासगावात फटाके फोडण्याच्या कारणावरून एकाचा खून तर एक गंभीर…

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – संतोष भंडारे

येळावी (ता, तासगाव) घरासमोर फटाके फोडण्याच्या कारणावरून कोयता व धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. दीपक जयसिंग सुवासे (वय २७) असे खून झालेल्याचे तर आकाश दीपक सुवासे हे गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी मयुरी दीपक सुवासे (वय २३ रा, येळावी)  गुन्हा दाखल झालेल्यात सूरज उर्फ विश्वजित सावकार मोहिते, इंद्रजित उर्फ लाल्या सावकार मोहिते व सुगंधा सावकार मोहिते सर्व रा, येळावी याचा समावेश आहे. या बाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी : संशयित इंद्रजीत हा दिवाळी निमित्त रात्री नऊ वाजता फिर्यादी मयुरी यांच्या दारात फटाके फोडत होता. यावेळी फिर्यादी यांनी फटाके फोडू नका माझ्या मुलाला धुराचा त्रास होतोय तो आजारी आहे अशी विनंती केली. मात्र याकडे दुर्लक्ष करून इंद्रजीत याने मी फटाके फोडणारच असे उलट बोलून त्यांना शिवीगाळ केली.
संशयित इंद्रजित, सूरज व सुगंधा हे सर्वजण हातात कोयता, धारधार शस्त्र व काठी घेऊन फिर्यादी मयुरी याच्या अंगणात आले. व त्यांनी दीपक व आकाश याच्यावर हल्ला केला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:57 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!