नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अवघ्या २४ तासाच्या आत मोटार सायकल चोरास जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री : दि.१६/१२/२०२४ रोजी मध्यरात्री निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील निजामपुर गावातील मेनरोड येथे राहणारे श्री. प्रवीण एकनाथ वाणी यांचे घरासमोरुन त्यांचे मालकीची एम.एच.१८ बी.यु.५३९९ हिरो स्प्लेंडर प्लस ६०,०००/- रुपये किंमतीची मोटार सायकल चोरीस गेली होती त्याबाबत श्री. प्रवीण एकनाथ वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीता विरुध्द गुरनं ३५१/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे आज रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयात कोणताही सबळ पुरावा नसताना गुप्त बातमीव्दारे, सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांकडे केलेल्या तपासावरुन आरोपी नामे रविंद्र मगन पाटील वय-२७ वर्षे रा. असाने ता. साक्री जि. धुळे यास गुन्हा घडल्याचा २४ तासाच्या आत ताब्यात घेवुन त्यांचे कडुन चोरीस गेलेली एकुण ६०,०००/- रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि/श्री मयुर भामरे, पोउनि/प्रदिप सोनवणे, पोहेकॉ/ एन.पी. माळचे, पोहेकॉ/ रतन मोरे, पोना/ खंडेराव पवार, पोकॉ/ टिलु पावरा, पोकॉ/ मुकेश दुरगुडे, पोकॉ/ कृष्णा भिल, पोकॉ/ सुनिल अहिरे, चापोकॉ/माळी यांचे पथकाने केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:19 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!