कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांक्या अनोखा उपक्रमाचे जनतेतून स्वागत

DPT NEWS NETWORK 🗞️✍️🗞️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापुर :- आगामी सन २०२५ मध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वतीने मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे नेतृत्वाखाली नागरिकांशी असलेले संबंध दृढ व्हावेत व नागरिकांच्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण व्हावे या करीता झिरो पेंडन्सीसह जिल्ह्यातील पोलीस अभिलेखावरील शरिरासह मालाविरुध्दच्या गुन्हेगारांच्या यादी तयार करुन आरोपी दत्तक योजनेस दि. ०१/०१/२०२५ रोजी पासून राबविणार आहेत.
झिरो पेंडेन्सी योजने अंतर्गत नागरिकांच्या वतीने त्यांच्या वेगवेगळ्या तक्रारींच्या संदर्भाने पोलीस ठाणेस तसेच वरिष्ठ पातळीवर प्राप्त होणारे तक्रारी/अर्जाची १ महिन्यात परिणामकारक निपटारा करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी, शाखा प्रमुखांसह, उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक यांना सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारे झीरो पेंडन्सीचे लक्ष्य सर्व जिल्हा पोलीस दलास निश्चित करुन दिलेले आहे. सुरवातीला किरकोळ स्वरुपाच्या वादामध्ये वेळीच हस्तक्षेप न केलेस त्यास गंभीर स्वरुप प्राप्त होवुन त्यातून पुढे गंभीर गुन्हे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात यावर परिणामकारक प्रतिबंध व्हावा व शुल्लक गोष्टींचे रुपांतर मोठ्या वादात होवु नये या करीता सदरची योजना अंमलात आणलेली आहे.
नवीन वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा व परिसरातील शरिराविरुध्दच्या गुन्ह्यांसह मालाविरुध्दच्या गुन्ह्यांना परिणामकारक आळा घातला जावा या करीता मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी आरोपी दत्तक योजनेची सुरवात केलेली आहे. आरोपी दत्तक योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावरील हिस्ट्रीशिटर / गैंग हिस्ट्रीशिटर / माहितगार गुन्हेगार / गंभीर गुन्ह्यातील आरोपी यांची यादी तयार करुन ती सर्व पोलीस ठाणे/विशेष शाखा यांना वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत आरोपींच्या संख्येनुसार १ पोलीस अधिकारी / १ अंमलदार यांचे पथक निश्चित करुन त्यांना त्या प्रमाणे आरोपी दत्तक देण्यात येणार आहेत. आरोपींना देखील घटनेने काही मुलभुत अधिकार प्रदान केलेले आहेत. या अधिकारांची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण व्हावी व त्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याग करुन कायद्याला मानना-या सर्वसामान्यांच्या मूळ प्रवाहात सामिल व्हावे या करीता या योजनेअंतर्गत परिणामकारक प्रयल करण्यात येणार आहेत. आरोपी दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात येणारे आरोपींना १५ दिवसातून किमान एकदा भेट देवून त्यांचे हालचालीबाबतची अद्ययावत माहिती घेणे, त्यांचे वर्तमान छायाचित्रे, त्यांचे नातेवाईक मित्र मंडळी यांची माहिती घेणे, विचारपूस करणे, त्यांच्या कौटुंबिक समस्या यांची माहिती घेवून त्या अभिलेखावर अद्ययावत करणे. त्याच प्रमाणे गुन्हेगारीचा त्याग करुन मूळ प्रवाहात सामिल व्हावे या करीता ही माहिती उपयोगात आणून समाजातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांसह जे तरुण गुन्हेगारीकडे आकृष्ट होत आहेत त्यांना त्यापासून परावृत्त करणे हे या योजनेचा मूळ उद्देश आहे.
अशा प्रकारे कोल्हापूर जिल्हा व परिसरात भयमुक्त समाजाची निर्मिती व्हावी पोलीस व सर्वसामान्य जनता यांचे संबंध दृढ व्हावेत या करीता आगामी वर्षात दोन उपक्रम प्राधान्याने अंमलात आणणेत येणार आहेत.



