नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वीज तारांच्या स्पर्शानं वाघाचे केले चार तुकडे; वनविभाग अन् पोलिसांनी घेतलं तिघांना ताब्यात

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ ✍️ प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

भंडारा : शेतकऱ्याने पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या वीजतारांच्या कुंपणात चक्क वाघ अडकल्याने मृत्युमुखी पडला. त्यामुळे शेतकरी घाबरला कारण वाघ मोठा असल्यानं कारवाईच्या भीतीपोटी शेतकऱ्यानं त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं धारदार शस्त्रानं वाघाचं शीर धडावेगळं करीत अक्षरशः चार वेगवेगळे तुकडे केलेत. कालांतराने प्रकरण अंगलट येवू नये म्हणून ते गावालगत असलेल्या तीन तलाव परिसरातील झांजरीया जंगलातील बीटात फेकून दिल्याची घटना (6 जानेवारी) रोजी उघडकीस आली होती.

ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत पाचोरा गावालगत असलेल्या झांजरिया बीटात उघडकीस आली. याप्रकरणी वनविभागानं मध्यरात्री तीन संशयतांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये राजू वरखडे (50), दुर्गेश लसुंते (50) आणि राजेंद्र उर्फ बस्तिराम कुंजाम (55) यांचा समावेश आहे.

शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या वीज प्रवाहातील तारांमध्ये अडकल्यानं वाघाचा मृत्यू झाला. मात्र, प्रकरण अंगलट येऊन कारवाई होईल, या भीतीनं मृत वाघाचं धारदार शस्त्रानं अक्षरशः कापून चार तुकडे केलेत. त्यानंतर चारही तुकडे गावालगतच्या तीन तलाव परिसरातील झांजरिया बिटातील फेकलेत. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात 6 जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली आणि वन विभागात एकचं खळबळ उडाली. घटनेचं गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह वन कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यावेळी घटनेचं गांभीर्य ओळखून वन विभागाने आरोपीचा माग काढण्यासाठी डॉग स्कॉड ला पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ बारापात्रे यांनी मृत वाघाचं शवविच्छेदन करून विसेरा उत्तरिय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यानंतर मृत वाघाचं शव घटनास्थळी दहन करण्यात आलं.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:28 am, January 13, 2025
temperature icon 19°C
साफ आकाश
Humidity 58 %
Wind 9 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!