नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मोबाईल इंटरनेट संकेत स्थळावरुन महिलांची / मुलींची ओळख करुन घेवुन, त्यांची फसवणुक करणा-या भामट्यास, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले जेरबंद

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे

कोल्हापूर:- महिलांना लग्नाचे खोटे आमिष दाखवून त्यांची लुबाडणूक व फसवणूक करण्याचे गुन्हे महाराष्ट्रभरात कुठे ना कुठे घडत असतात काही महिला बदनामीस घाबरून गुन्हे दाखल करत नाही त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत जाते व इतर दुसऱ्या महिलांना देखील तसेच पद्धतीने फसवून करत असतात जर पोलिसात गुन्हा दाखल केला तर पोलीस त्या गोष्टीचा तपास करून त्या प्रकरणात पीडित महिलेस मदत केली जाते व तसे कृत्य करणाऱ्या भामट्यास जेरबंद केले जाते. अशाच फसवणुकीचा गुन्हा कोल्हापूर येथे दाखल करण्यात आला. दिनांक १०/०१/२०२५ रोजी एका घटस्फोटित महिलेने फिरोज निजाम शेख रा. कॅम्प पुणे यांने आपली Shadi.Com या संकेत स्थळावर ओळख करुन घेवुन आपल्या बरोबर लग्न करण्यास पसंती दर्शवुन व सदर महिलेला भुरळ पाडुन त्यांना वेगवेगळी कारणे सांगुण १,६९,०००/-रुपये रोख व ८,२५,०००/-रुपये रक्कमेचे ११ तोळे सोने घेवुन फसवणुक केल्याबाबत मा. पोलीस अधीक्षक साो कोल्हापूर यांचेकडे तक्रार केली. मा.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सर, यांनी सदरच्या महिलेची तक्रार ऐकुन घेवुन सदर तक्रारी मधील गांभीर्य लक्षात घेवुन तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध घेवुन त्यास अटक करणे बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सुचना दिल्या होत्या.

सदर महिलेकडे सविस्तर चौकशी केली असता, सदर घटस्फोटित महिलेला एक लहान मुलगा असल्याने मुलाचे भवितव्य व आपल्या जीवनामध्ये जोडीदार असावा या विचाराने लग्न करण्याचे ठरवुन तिने तिची प्रोफाईल तयार करुन Shadi.Com या संकेत स्थळावर पाठविली होती. आरोपी फिरोज शेख रा. कॅम्प पुणे याने रिक्वेष्ट पाठवुन सदर महिलेचा मोबाईल नंबर घेवुन तो उच्चशिक्षित व इंडस्ट्रीयल कॉन्ट्रेक्टर असल्याचे व त्याची ५ कंपन्यांची व्हेंडरशिप असल्याची खोटी माहिती दिली. फिरोज शेख हा सदर महिलेच्या घरी दखील आला व घरच्यानांही त्याने खोटी माहीती दिली. त्याने दिलेल्या माहितीवर महिलेचा विश्वास बसला व तिने लग्नास पसंती असल्याचे कळविले. दरम्यान फिरोज शेख याने सदर महिले बरोबर वेळोवेळी मोबाईलवर संपर्क करुन तिला लग्नाचे अमिष दाखवुन व तिचा विश्वास संपादन करुन तिला आपल्या जाळ्यात ओढुन तिला शारिरीक संबध करणेस भाग पाडले. त्यानंतर त्याने त्याच्या वेगवेगळ्या अडचणी सांगण्यास सुरवात करुन, तिचेकडे पैशाची मागणी करु लागला. तो सांगत असलेल्या गोष्टीवर सदर महिलेने विश्वास ठेवुन तिने तिचेकडील वेळावेळी ११ तोळे सोन्याचे दागिणे, व १,६९,०००/-रु रोख रक्कमही वेळोवेळी त्याला दिली. त्यानंतर त्याने त्यास ब्रेनटयुमर आजार झालेला आहे, त्याचे आयुष्य कमी आहे. त्याचेवर मोठी शस्त्रक्रिया होणार आहे. असे सांगुन संपर्क तोडु लागला. त्यामुळे सदर महिलेला आपली फसवणुक झालेली आहे याची खात्री झाल्याने सदर महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि न.२१/२०२५ भा.न्या.स. कलम ६४,३१४, ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोउपनि मोरे व ०३ अंमलदार यांचे तात्काळ पथक तयार करुन, आरोपीचा शोधघेण्यासाठी पुणे येथे रवाना केले. सदर पथकांने तांत्रीक माहिती व गोपनीय बातमीच्या आधारे नमुद आरोपी फिरोज निजाम शेख रा. कॅम्प पुणे याचा मुंबई व पुणे येथे तपास केला परंतु आरोपी फिरोज शेख हा मिळुन आला नाही. दि. १२/०१/२०२५ रोजी आरोपी फिरोज शेख हा कोढवा, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने आरोपीस सदर ठिकाणाहुन ताब्यात घेतले. नमुद पिडीत महिलेकडुन घेतलेल्या रक्कमेपैकी आरोपीकडुन १,००,०००/- रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे. तसेच त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, नमुद आरोपीत याने Shadi.Com च्या माध्यमातुन महिला /मुलींना आपल्या जाळयामध्ये ओढुन त्यांचेशी शारिरिक संबध त्याचप्रमाणे त्यांचे कडुन पैशाची मागणी करुन त्यांची फसवणुक केल्या बाबतची माहिती पुढे येत आहे.

सदर आरोपीचे पुर्ण नाव फिरोज निजाम शेख, मुळ पत्ता गंगावळण, कळाशी, ता. इंदापुर, पुणे सध्या राहणार फ्लॅट क्र. ६०२, बी विंग, आयडियल होम अपार्टमेंट, उस्मानिया मजीद जवळ, मिठानगर, कोंढवा, पुणे असा आहे. अधिक माहिती मध्ये आरोपीचे लग्न झालेले असुन त्याला दोन मुले आहेत. नमुद आरोपीविरुदध अशाच प्रकारचे यापुर्वी इंदापुर पोलीस ठाणे गुर. क्र. ५८/२०१३ भादवी कलम ३६३,३६६,३७६ नुसार गुन्हा दाखल असलेचे समजते. तसेच आरोपी याने यापुर्वी Shadi.Com च्या माध्यमातुन ओळख करुन २५ पेक्षा जास्त महिलांची फसवणुक केल्याचे दिसुन येत आहे. नमुद आरोपीस जुना राजवाडा पोलीसांचे ताब्यात दिलेले असुन सदर गुन्हयाचा तपास महिला पोलीस उप निरीक्षक अपर्णा जाधव ह्या करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक,  महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, विलास किरोळकर, सचिन पाटील, अमित सर्जे, सोमराज पाटील, योगेश गोसावी, राजेंद्र वरंडेकर, सुरेश पाटील, शिवानंद मठपती सायबर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक अतिश म्हेत्रे, पोलीस अमंलदार सचिन बेंडखळे यांनी केलेली आहे.

अशा प्रकारच्या अमिषाला महिला व मुलींनी बळी पडु नये व नमुद आरोपीत याने ज्यांची फसवणुक केलेली आहे त्यांनी जुनाराजवाडा पोलीस ठाणेशी संपर्क करावा असे कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अवाहन केलेले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:33 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!