नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कॉपर केबल चोरी करणारी टोळी गजाआड; निजामपुर पोलीसांची धडक कारवाई

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री:- निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील टिटाणे गाव शिवारात दि. २०/०१/२०२५ रोजी पहाटे ०३.०० ते ०३.३० वाजेच्या सुमारास सुजलॉन ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीचे टॉवर क्रमांक K-१३८ मधील १,९७,०००/- रु. किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ००११/२०२५ बीएनएस कलम ३०५.३३१ (३),३३१ (४), ३ (५) प्रमाणे दि.२०/०१/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनी मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे ०१. आसीफ कासम शहा, २) वसीम जुमा शाह, ३) आमिन करीम शहा, ४) प्रवीण सुनिल बागले सर्व रा. जैताणे ता. साक्री जि. धुळे ५) घनश्याम रविंद्र अहीरराव ६) रविंद्र भाऊसाहेब देवरे दोन्ही रा. टिटाणे ता. साक्री यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेलेल्या मुद्देमाल कॉपर केबल वायर व गुन्हा करतांना वापरलेल्या १) स्कोडा कंपनीची गाडी क्र.MH-०४ EF-४५९० सिल्वर रंगची जु.वा.की.अ. २) मारुती इको MH-१८ BX-८२६१ पांठ-या रंगाची जु.वा.की.अ. असे गुन्ह्यात वापरेल्या दोन वाहनांसह एकूण ८,९७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन जप्त करुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/मयुर भामरे, पोउनि/प्रदिप सोनवणे, पोउनि/मधुकर सोमासे, श्रेपोसई/प्रभाकर गवळे, असई/रुपसिंग वळवी, पोहेकों/प्रशांत ठाकुर, पोहेकों/नारायण माळचे, पोहेकॉ/रतन मोरे, पोहेकों/नागेश्वर सोनवणे, पोहेकों/प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकों/सागर थाटसिंगारे, पोकों/कृष्णा मिल, पोकों/रामभाऊ गायकवाड, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकों/गौतम अहिरे, चापोहेंकों/मनोज देवरे अशांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:16 pm, January 21, 2025
temperature icon 30°C
साफ आकाश
Humidity 21 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:09 am
Sunset: 6:13 pm
Translate »
error: Content is protected !!