नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वाहणात वाळू 5 ते 15 ब्रास, रॉयल्टी मात्र 3 ब्रासची


* डेपो चालकांची मनमानी
* महसूल विभागाच्या मदतीने शासनाला रोजचा कोट्यावधीचा चुना
* विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी

भंडारा :- वाळू डेपोंमधून रॉयल्टी पेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळू वाहणात भरून ती नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात नेऊन विकण्याचा गोरखधंदा सध्या जोरात सुरु आहे. यातून शासनाचा दररोज कोट्यावधीचा महसूल बुडत आहे, तर दुसरीकडे डेपो चालक व त्यांना मदत करणारे अधिकारी मालामाल होत आहेत. हा सर्व प्रकार थांबवून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ट्रक ट्रॅक्टर चालक मालक संघटनेने एका निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त व भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
  वाळू तस्करीला आळा बसावा आणी नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मागील वर्षी  डेपो पद्धती सुरु केली. वाळू हवी असल्यास आधी ऑनलाईन बुकिंग करायची व नंतर डेपो मधून वाळूची उचल करायची. या डेपो पद्धतीमुळे वाळू चोरी थांबेल असा शासनकर्त्यांचा समज होता. मात्र त्यांचा हा समज पूर्णतः खोटा ठरला. वाळू चोरी थांबविण्यासाठी डेपो सुरु करण्यात आलेत मात्र सध्या या डेपोंमधूनच मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत आहे. ट्रक मध्ये 5 ते 15 ब्रास पर्यंत वाळू भरायची व चालकाला रॉयल्टी मात्र 2 किंवा 3 ब्रासची द्यायची. डेपो चालकांचे असे चोर धंदे जोरात सुरु आहेत. शासकीय दरानुसार एक ब्रास वाळूकरिता दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यातील 600 रुपये शासनाच्या तिजोरीत तर उरलेले पैसे व्यवस्थापन खर्चाच्या नावावर डेपो चालकाच्या खिशात जातात. या व्यतिरिक्त डेपो चालक ट्रक मालकांकडून प्रती ब्रास 2 हजार 500 रुपये वसुलतात. एकूण पैशाचा हिशोब केल्यास एका ब्रास मागे 600 रुपये शासनाच्या तिजोरीत तर 3 हजार 900 रुपये डेपो चालकाच्या घशात जातात. एका डेपो मधून दिवसाला 500 ते 1000 ब्रास वाळू विकली जाते. म्हणजे दिवसाला 20 ते 40 लाख रुपये घाट चालकाच्या तिजोरीत जात आहेत. हा सर्व प्रकार महसूल आणी माइनिंग विभागातील अधिकाऱ्यांच्या देखरेखित सुरु आहे.

—-> ऑनलाईन बुकिंगचा खेळ

    डेपो चालक वेगवेगळ्या व्यक्तींच्या आधार कार्डची मदत घेऊन स्वतःच वाळूची ऑनलाईन बुकिंग करतात. त्यामुळे एखादा ग्राहक डेपोचे नाव टाकून ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला बुकिंग फुल झाल्याचे आढळून येते. मजेशीर बाब म्हणजे काही डेपोची बुकिंग मध्यरात्रीला सुरु करुन दोन तीन तासांच्या अवधीतच बंद केली जाते. या दोन तीन तासांच्या कालावधीत डेपो चालक बोगस नावाने वाळूची बुकिंग करतात व बुकिंग केलेली वाळू ट्रक चालकांना दुपटीपेक्षा अधिक दराने विकतात. ऑनलाईन बुकिंग च्या खेळात महसूल व माइनिंग विभागाचे अधीकारी सहभागी असल्याची माहिती आहे.

—> तपासणी नाक्यांची जिल्हाधिकाऱ्यांना गरज नाही का?

    गौण खनिज तपासणी करीता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असतांना सुद्धा कुठेही गौण खनिज तपासणी नाके किंवा चौक्या दिसत नाहीत. त्याची भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना गरज वाटत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

—> विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

     वाळू डेपोंमध्ये सुरु असलेली डेपोचालकांची मनमानी व करण्यात येत असलेली लूट थांबवून डेपोवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी ट्रक ट्रॅक्टर चालक मालक संघटनेचे प्रशांत दहिवले, मुलचंद तलमले, गणेश फटिंग, गणेश मुंडले, निहाल बोरकर, अक्षय बांगळकर, नंदू तिघरे, अमोल मुंजेकर, प्रफुल भोले, त्रिभुवन दंडारे, सुभाष सेलोकर, निखिल तिघरे, प्रशांत डोये, अतुल भुरे आदींनी विभागीय आयुक्त, भंडारा जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!