नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुख पदी रामेश्वर नाईक यांची निवड सार्थ – उमेश चव्हाण, अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद

रामेश्वर नाईक यांचे रुग्ण हक्क परिषदेने केला सत्कार!

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर:- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून आजच रामेश्वर नाईक यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख पदी रामेश्वर नाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी त्यांचे सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले कि, गेली अनेक वर्षे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात म्हणून संघर्ष करणारा कार्यकर्ता अशी रामेश्वर नाईक यांची ओळख आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी सर्वसामान्य रुग्णांना उपचारांसाठी मदत मिळवून दिली आहे. ‘सर्वसामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा प्रमुख’ ही वाटचाल प्रेरणादायी आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक यांची केलेली निवड अत्यंत योग्य व सार्थ अशी आहे.
सत्काराला उत्तर देताना रामेश्वर नाईक म्हणाले कि, मंत्रालयातील विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन झाल्यापासून सदरील कक्षाचा प्रमुख म्हणून हजारो रुग्णांना कोट्यावधी रुपयांची मदत मिळवून दिली. सोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख पदी निवड झाल्याने जबाबदारी वाढली असून माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक रुग्णाला लागेल ती यथोचित मदत करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पैसे नाहीत म्हणून कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांचा सत्कार आणि अभिनंदन केले. याप्रसंगी विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये, परिषदेचे केंद्रीय कार्यालय प्रमुख दिलीप साळुंके, रुग्ण हक्क परिषदेचे लातूर जिल्हाध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, ग्राहक कायद्याचे जनक तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे प्रणेते नाना उर्फे बिंदू माधव जोशी प्रणित ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर सह पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:56 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!