नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्रीत मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पंडित प्रदीप जी मिश्रा यांचा पुस्तक व पुष्पगुंच देवून सन्मान.

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री : साक्री शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता श्री पंडित प्रदीप जी मिश्रा यांचे शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.या कथा कार्यक्रमाची सुरूवात दि.२४ जानेवारी रोजी पासून झाली आहे तर समारोप ३० जानेवारी रोजी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ लगत असलेल्या फौजी पेट्रोल पंपा समोर असलेल्या ठिकाणी शिव महापुराण कथेसाठी भव्य सभामंडप उभारण्यात आला असून त्या ठिकाणी शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी पहिल्या दिवसापासून लाखों भाविक भक्त येत आहेत. राज्याचे  शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी शिक्षणमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासुन ते ज्या ठिकाणी भेट देत आहेत त्या ठिकाणी सत्कार,भेट वस्तू म्हणून पुस्तक स्वीकारत आहेत त्यांच्या या साधेपणा उपक्रमाचे राज्यभरातील शिक्षक व पालकवृंद कौतुक करीत आहेत. आज शनिवारी रोजी साक्री शहरात आयोजित शिव महापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता श्री पंडित प्रदीप जी मिश्रा यांची भेट घेतली त्या प्रसंगी त्यांनी पंडित प्रदीप जी मिश्रा यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी त्यांनी मालेगाव येथे पार पडलेल्या पुण्यश्री शिव महापुराण कथेच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी त्यावेळच्या नियोजनाचे, भक्तांनी केलेल्या सहभागाचे तसेच भाविकांच्या गर्दीचे कौतुक केले. शिव महापुराण कथेच्या या अनोख्या सोहळ्या मुळे साक्री शहराला आलेले यात्रेचे स्वरूप, पवित्र, भक्तिमय झालेले वातावरण याचाही उल्लेख या वेळी त्यांनी केला.या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट)सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले, सहसंपर्कप्रमुख विशाल देसले आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!