नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई, एम.डी. ड्रग्ज व ड्रग्ज बनविणारा कारखान्यावर कारवाई २९,७३,५५,२०० /- रु चा मुद्देमाल जप्त

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ दर्शन पोलीस टाइम

सांगली प्रतिनिधी :- रमजान मुलानी

सांगली :- मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म.रा. मुंबई व सांगली जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात नशा मुक्त अभियान सुरु केले आहे. त्या अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे, मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी मानवी जीवनावर परिणाम करणा-या अंमली पदार्थाची विक्री, तस्करी, साठा व उत्पादन करणारे इसमांचे बाबत माहिती काढून त्यांचेवर कडक कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे. मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी दिले आदेशाप्रमाणे स्था.गु.अ. शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी स्था.गु.अ. शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करणेबाबत निर्देश दिले होते.

सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे घटनेची माहिती देताना.

त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे अधिनस्त वरील पोलीस अंमलदार यांचे पथकाने अंमली पदार्थ विक्री, तस्करी, साठा व उत्पादन करणारे इसमांचे बाबत गोपनीय माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेवर लक्ष केंद्रीत केले. त्याप्रमाणे स्था.गु.अ. शाखेचे पोहवा / सागर टिंगरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, ” विटा हद्दीतील कार्वे एम आय डी सी, रामकृष्ण हरी गाऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी इसम बलराज कातारी हा चार चाकी वाहनातून मेफॅड्रॉन (एम. डी) नावचे अंमली पदार्थ विक्री करीता घेवून जाणार आहे. नमुद गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची हकीकत संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांना कळवुन कारवाई बाबत सुचना व मार्गदर्शन घेवुन वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीची खात्री करणे करीता शासकीय व खाजगी चार चाकी वाहनाने रवाना होवून शासकीय पंच, अधिकृत वजनकाटा धारक व खाजगी फोटोग्राफर यांना बोलावून तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगांव विभाग, तासगांव अतिरिक्त कार्यभार विटा उपविभाग, विटा यांचे कडील झडती व कारवाईचे अधिकारपत्र घेवुन कारवाई कामी कार्वे गावचे हद्दीत असले एम आय डी सी येथे रोडने आत जावुन मिळाले बालमीच्या ठिकाणा पासून थोडे अंतरावर अलीकडे येणारे जाणारे वाहनावर वाँच करीत थांबलो असता रामकृष्ण हरी गाऊली इंडस्ट्रीज समोरील पत्र्याचे गेट मधून एक सशंयीत पांढरे रंगांची हांडाई आय २० तिचा आरटीओ क्रमांक एमएच ४३ ए एन १८११ चार चाकी वाहन बाहेर येत असताना दिसल्याने पोलीस वाहनातील चालकास वाहन बंद करणेस सांगितले. स्टाफने त्या वाहनास १९.४५ वा. सुमारास थांबवून त्या त्यानंतर सपोनि पंकज पवार यांनी उपस्थित सर्वांचे समक्ष वाहनातील इसमास नाव गांव विचारले असता, त्यातील चालकाने त्याचे नाव १) ABC व शेजारी बसलेले इसमाने त्याचे नाव २) बलराज अमर कातारी वय २४ वर्ष रा. साळशिंगे रोड आयटीआय कॉलेज जवळ विटा असे असल्याचे सांगितले. त्यावेळी क्र. ०१ यांने सदरचे वाहन त्याचे वडीलांचे नावावरती असुन तो क्र. ०२ याचे भाडे घेवुन आल्याचे त्यांने सांगितले. परंतु क्र. ०२ यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. नमुद इसमांना वाहनातुन उतरुन प्राप्त बातमीची माहिती देवून क्र. ०२ यास विश्वासात घेवुन विचारणा केली असता अ. नं. २) बलराज कातारी याने सांगितले की, रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केलेला मेफॅड्रॉन (एम.डी) नावचा अमंली पदार्थ प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरुन तो ट्रॅव्हलिंग बैंगे मध्ये ठेवुन मुंबई येथे विक्री करीता घेवुन चालला होता. सदरचे वाहन भाडयाने घेतलेले असुन याबाबत त्याचे सोबत असलेला वाहन चालक ABC यास काही माहिती दिलेली नाही. तसेच सदरचे एम.डी ड्रग हे गाडीचे डिक्कीगध्ये बॅगामध्ये ठेवले असुन त्याचा मित्र रहुदिप धानजी बोरिचा व सुलेमान जोहर शेख यांनी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केला आहे. त्याचवेळी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या शेडमध्ये संशयीत हालचाल दिसुन आल्याने सपोनि / पंकज पवार यांनी तात्काळ सोबत असलेल्या पोलीस अंगलदारांना सदर ठिकाणी पाठवुन तेथील संशयित रहुदिप धानजी बोरिचा व सुलेमान जोहर शेख यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या कारखान्याची झडती घेतली असता सदर ठिकाणी व पांढरे रंगांची झुंडाई आय २०. क्रमांक एमएच ४३ ए एन १८११ या वाहनामध्ये खालीलप्रमाणे मेफेंड्रॉन (एम. डी) हा अंमली पदार्थ व ते बनविण्याकरीता वापरलेले साहित्य मिळुन आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:49 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!