नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भंडाऱ्यात शालेय विद्यार्थिनीचा व्हॅन चालकाकडून वाहनातच विनयभंग

DPT NEWS NETWORK ✍️ 🗞️🗞️✍️       🚨 दर्शन पोलीस टाइम 🚨
  प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर


भंडारा : प्रत्येक पालक आपल्या मुलांना शाळेत जाणे व येण्यासाठी स्कूल बस किंवा रिक्षा, टॅक्सी, खाजगी व्हॅन अशा वाहनांचा पर्याय निवडत असतात त्यात तो वाहन चालक चांगला असला तर ठीक नाहीतर चुकीच्या गोष्टीचा देखील अनुभव त्या चालकाकडून विद्यार्थ्यांना व पालकांना येत असतो. असाच प्रकार भंडारा शहरात घडला, विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या स्कूल व्हॅन चालकाने १० वर्षे वयाच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी व्हॅनचालक सुभाष नेवारे (३३, विद्यानगर, भंडारा) याला अटक करून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही व्हॅन कोमल शेंडे याच्या मालकीची आहे. या वाहनावर सुभाष नेवारे हा चालक म्हणून कामाला होता. त्याच्या व्हॅनमधून १० वर्षांची बहीण व आठ वर्षांचा लहान भाऊ शाळेला जायचे. शनिवारी १ फेब्रुवारीला सुभाष व्हॅन घेऊन संबंधित विद्यार्थिनीच्या घरी पोहचला. सकाळी ८:४५ वाजता दोन्ही भावंडांना घेऊन जाताना त्याने लहान भावाला मागच्या शिटवर बसायला सांगून बहिणीला समोरील सीटवर बसविले. काही अंतर गाठल्यावार त्याने चाळे सुरू केले. या प्रकाराने ती घाबरून गेली. त्याच्या कृत्याला विरोध करूनही तो वारंवार चाळे करतच राहिला.

मुलगी शाळा सुटल्यावर रडत घरी आल्याने आईने तिला विचारपूस केली असता, घडलेला प्रकार तिने सांगितला. त्यामुळे पालकांनी व्हॅनमालकाला मोबाईलवरून कॉल करून घडलेला प्रकार कळविला. मात्र व्हॅनमालक कोमल शेंडे याने फारसे मनावर घेतले नाही. अखेर, सोमवारी विद्यार्थिनीच्या आईने भंडारा पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!