नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तुमसर शहरात ड्रायक्लीनर्सच्या दुकानातून ५ कोटींचे घबाड जप्त..

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ दर्शन पोलीस टाइम 🗞️ प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

तुमसर : जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांना गुप्त बातमीदार तर्फे मिळालेल्या माहितीच्या आधारे तुमसर शहरातील इंदिरानगरात असलेल्या राजकमल ड्रायक्लीनर्स आर्ट या दुकानावर धाड टाकून पोलिसांनी पाच कोटींची रक्कम जप्त केली. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

दुकानाचे संचालक जगदीश काटकर यांना या रकमेविषयी चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिले नाहीत. याप्रकरणी अॅक्सिस बँकेच्या तुमसर येथील व्यवस्थापकासह इतर पाच ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तसेच त्याठिकाणी अॅक्सिस बँकेचे रिजनल व्यवस्थापक, तसेच रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोट, भंडारा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, प्रदीप शहारे, पंकज भित्रे, सचिन देशमुख, रवींद्र गभने, सचिन सरोदे, राजेंद्र ठाकरे, देवेंद्र चामट, विजय आरणे यांनी केली.

दुकानात आढळलेली रक्कम हाताने, मोजणे शक्य नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तातडीने पैसे मोजण्याची मशीन दुकानातच बोलावली. या मशीनवर ही रक्कम मोजण्यासाठी सुमारे दोन तास लागले. ही रक्कम पाच कोटी रुपये भरली. त्यात १०० आणि ५०० रुपयांची बंडले होती.

आंतरराज्य कनेक्शन?

तुमसर येथील ड्रायक्लीनर्समधून हस्तगत करण्यात आलेली पाच कोटींच्या बेहिशेबी रकमेचे कनेक्शन उत्तराखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश व दिल्लीशी असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. ही मोठी रक्कम कोणाच्या माध्यमातून आणि कुठे जात होती, हा देखील तपासाचा महत्त्वाचा भाग आहे.

या संपूर्ण घटनाक्रमात तुमसर येथील अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणातरी जबाबदार व्यक्तीच्या सांगण्यावरून या व्यवस्थापकाने ही रक्कम बँकेतून अनधिकृतपणे काढली होती. ‘त्या’ व्यक्तीला ही रक्कम दिल्यावर बदल्यात त्याला सहा कोटी रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर मिळालेल्या रकमेतून पाच कोटी बँकेत जमा करून व्यवस्थापकाला एक कोटी रुपयांचे भले मोठे कमिशन मिळणार होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली आणि या घटनेचा भांडाफोड झाला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:47 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!