नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूरातील अट्टल घरफोड्यास पावणेदोन लाखाच्या मुद्देमालासह अटक – राजारामपुरी पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🗞️🚨 दर्शन पोलीस टाइम 🚨
प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर:- राजारामपुरी पोलिस ठाणेचे हद्दीत अट्टल घरफोड्यास गुन्हे शोध पथकाने अटक केली.
पोलिस ठाणे मधुन मिळालेली अधिक माहिती अशी की. यातील फिर्यादी प्रसाद मारुती शिंदे, वय ४१, वर्षे, रा. कॉ.नं. ३४, पाचगांव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर , शिल्पजा प्रमोद कनगुटकर यांचे दुकानात मानसिंग रेसिडेन्सी येथील ६ व्या मजल्यावरील यांचे बंद असलेल्या फ्लॅट नं. ६०१ येथे अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी करून रोख रक्कम चोरी केलेबाबत राजारामपुरी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्हयाचे अनुषंगाने पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपास करण्याच्या सुचना दिल्या. गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे अनुषंगाने तपास करत संशयीत आरोपी यश दिपक बरगे, व.व.१९, रा. मानसिंग रेसिडेन्सी, राजारामपुरी ५ वी गल्ली, कोल्हापूर याला ताब्यात घेवुन त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने आपणच चोरी केली असल्याची कबुली दिली. आरोपी याचेकडुन चोरी केलेल्या रक्कमेतील रोख रक्कम १,३०,००० रुपये व चोरीच्या पैशातुन खरेदी केलेली मोटर सायकल किंमत ४०,००० रुपये असे एकुण १,७०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी याच्यावर गु.र.नं. ८५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३२१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हे दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक दत्तात्रय भोजणे हे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:08 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!