नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वैदयकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, विक्री प्रकरणी, वितरक मुख्य संशयित इंतेजार अली जहीरुद्दीनला अटक

महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई

DPT NEWS NETWORK 🗞️ 🚨 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी :- बापूसाहेब कांबळे

सांगली :- सांगली आणि मिरजेत नशेची औषधे विकणाऱ्या टोळीला मिरजेत पोलिसांनी जेरबंद केल होते. याप्रकरणी नशेची वैद्यकीय औषधे इंजेक्शन वितरण करणारा उत्तरप्रदेश येथिल मुख्य संशयित इंतेजार अली जहीरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता पर्यंत अटक केलेल्यांची संख्या 13 वर पोचली आहे. आरोपी रोहीत अशोक कागवाडे, ओंकार रविंद्र मुळे, अशपाक बशीर पटवेगार, वैभव ऊर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे, ऋतुराज आबासाहेब भोसले, अमोल सर्जेराव मगर, साईनाथ सचिन वाघमारे, अविनाश पोपट काळे, देवीदास शिवाजी घोडके, आकाश अंकुश भोसले, हणुमंत पांडुरंग शिंदे, ललीत सुभाष पाटील, इंतेजार अली जहीरुद्दीन अशी आत्तापर्यंत अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींच्या कडून सव्वा सहा लाख किमतीचे मेफेनटर्माईन इंजेक्शनच्या बॉटल इतर गोळया आणि साडेआठ लाख रुपये किमतीची वाहने असा साडे चौदा लाख रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यांच्यावर महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंतेजार अली जहीरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:49 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!