DPT NEWS NETWORK 🗞️🚨 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री: साक्री तालुक्यातील जि. पशाळा उभरांडी येथे सालाबादाप्रमाणे भव्य अंकुर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.नेहमी प्रमाणे सकाळी बालआनंद मेळावा घेण्यात आला शाळेतील इयत्ता चौथीच्या मुलामुलींनी अनेक पदार्थ विक्रीसाठी आणले होते, बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन दुसाणे केंद्राचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पवार व दुसाणे केद्राचे केंद्र प्रमुख अनिस शाह यांनी केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनी प्रत्येक वस्तुचा आस्वाद घेतला
संध्याकाळी वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या कार्यक्रमाचे उद्घाटन साक्री तालुक्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार मजुंळाताई गावीत यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन शिवसेनेचे(शिंदे गट)जिल्हाप्रमुख डाॅ.तुळशीराम गावीत यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र पगारे साहेब व साक्री तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री पकंज मराठे तसेच माजी प.स सदस्य जैताणे गण व जैताणे सरपंच प्रतिनिधी श्री अशोक मुजगे ,समता परिषद जिल्हाध्यक्ष श्री राजेश बागुल साक्री तालुक्यातील विविध संघटनाचे पदाधिकारी व धुळे नंदुरबार जिल्हा ग.स बॅंकेचे विद्यमान चेअरमन व संचालक व धुळे नंदुरबार प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक उभरांडी गावाचे विद्यमान सरपंच श्री नारायण सावळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष सावळे व जेष्ठ नागरिक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तालुक्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार यांची दुसर्यादां साक्री विधान सभेवर निवडून आल्याबद्दल उभरांडी गावातील गावकरी, विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्य व शाळेतील सर्व शिक्षक यांच्या मार्फत नागरी सत्कार करण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलामुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमात केलेल्या अभिनयाची आमदार मजुंळाताई गावीत यांनी कौतुक केले,आमदार गावीत यांनी आपल्या भाषणात म्हणाले एवढा भव्य दिव्य कार्यक्रम जि.प शाळेत मी पहिल्यांदाच पाहिला अशी जि.प शाळा जिल्ह्यात आर्दश शाळा म्हणून ओळखली जाईल तसेच उभरांडी गावातील दत्त प्रभुचे मंदिर मी पुर्ण केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन दिले.व तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्याना बक्षीस दिले व आपल्या भाषणात उभरांडी गावाच्या विकासाठी आम्ही प्रयत्नशील राहु अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार धुळे नंदुरबार जिल्हा ग.स बॅंकेचे विद्यमान संचालक श्री प्रकाश बच्छाव सर यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक श्री सदाविव पाटील सर ,उपशिक्षक श्री वसंत तोरवणे सर ,श्री सुनिल जाधव सर, शिक्षिका सौ. मिनाक्षी जाधव मॅडम, सौ प्रतिभा न्याहळदे मॅडम ,श्री प्रभाकर वाघ ,श्री शरद पवार आदींनी मेहनत घेतली.



