नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चाळीसगांव येथे सत्यकाम न्युज महाराष्ट्र तर्फे पत्रकारांसाठी मोफत हेल्मेट व पत्रकारांच्या मुलांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.

DPT NEWS NETWORK 🗞️ 🚨 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाइम 🚨प्रतिनिधी:- अजगरभाई मुल्ला

चाळीसगांव – शहरातील धुळे रोडवरील, के.आर. कोतकर कॉलेज येथे सत्यकाम न्युजचा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सत्यकाम न्युज वर्धापन दिनानिमित्ताने सत्यकाम न्युजचे उपसंपादक तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांच्यातर्फे व्हाईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या पत्रकारांना मोफत हेल्मेट व पत्रकार पाल्यांना मोफत शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिरोडे, स्वच्छतादूत विजय शर्मा, आदर्श शेतकरी बापुराव पाटील, प्रणव मांगो पवार, राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त खेळाडू, कावेरी सुभाष गडाख, उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये हँडबॉल या खेळाचे महाराष्ट्र संघाकडून निवड, गायत्री वामन जाधव, राष्ट्रीय समाज स्पर्धेत व आंतर विद्यापीठ स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमदार मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहायक पोलीस निरीक्षक सतिश पाटील, युवा उद्योजक राज पुंशी, माजी नगरसेवक रामचंद्र जाधव, उद्योजक भिमराव खलाणे, सामाजिक कार्यकर्ते बापुराव पवार गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी, सरस्वती हॉस्पिटल च्या संचालिका डॉ.सुनीता पवार तसेच व्हाईस ऑफ मीडियाचे चाळीसगाव तालुक्याचे पदाधिकारीउपस्थिती होते.

यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.सी.पाटील सरांनी केले, या कार्यक्रमाचे आयोजन सत्यकाम न्युज चे उपसंपादक कल्पेश महाले यांनी केले होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!