नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

३००० हजार लाच मागितली प्रकरणी सांगवडेचे तलाठी व कोतवाल वर गुन्हा दाखल. – कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- संजय दिंडे

कोल्हापूर:- वडीलोपार्जीत शेतीच्या सातबारा उतारावर नाव नोंद करण्यासाठी सांगवडेचे तलाठी व कोतवाल यांनी पाच हजाराची मागणी केली. मागणी केलेल्या पाच हजार मध्ये तडजोड करत तिन हजार रूपये मागणी केलेचे निष्पन्न झालेने तलाठी अविनाश कोंडीग्रेकर व कोतवाल सर्जेराव कुंभार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. यातील मुळ तक्रारदार यांचे सांगवडे गांवी गट क्र. ७६,७७ ची वडीलोपार्जीत शेतजमीन आहे. तक्रारदार हे आजोबांना व वडीलांना सरळ वारस आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या आजोबांचे नावे असलेल्या जमीनीस वारस म्हणून सातबारा पत्रकी तक्रारदार यांचे नांव लावणेकरिता तक्रारदार हे तलाठी कार्यालय सांगवडे येथे गेले असता सांगवडे गावचे तलाठी अविनाश कोंडीग्रेकर यांनी कोतवाल सर्जेराव कुंभार यांना भेटणेस सांगितले. म्हणून तक्रारदार हे कोतवाल सर्जेराव कुंभार यांना भेटले. त्यावेळे कोतवाल सर्जेराव कुंभार यांनी आजोबांच्या जमीनीस वारस म्हणून तक्रारदार यांचे नांव नोंदणी करण्याकरिता त्यांचे स्वतःसाठी व तलाठी कोंडीग्रेकर यांचेसाठी असे दोघांचे मिळून ५००० हजार रुपये द्यावे लागतील तेव्हाच वारस म्हणून नांव नोंदणी होईल असे तक्रारदार यांना सांगितले. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना काही तरी कमी करा अशी विनंती केली. त्यावेळी कोतवाल सर्जेराव कुंभार यांनी दोघांचे मिळून ३००० रुपयांची मागणी केली म्हणुन तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे तक्रार दिलेली होती. सांगवडे गावचे कोतवाल सर्जेराव कुंभार यांनी स्वतः करीता व तलाठी कोंडीग्रेकर यांचेकरीता अप्रामाणिकपणे व बेकायदेशीरपणे तक्रारदार यांचेकडे ५००० रूपये ची मागणी करून तडजोडीअंती ३००० रूपये लाचेची मागणी तलाठी कोडींग्रेकर यांचेसमक्ष केली तसेच तलाठी कोंडीग्रेकर यांनीही कोतवाल सर्जेराव यांनी माझेकडे मागणी केलेल्या लाच रकमेस संमती देवून लाच रक्कम सर्जेराव यांचेकडे देण्यास प्रोस्ताहान दिल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी लोकसेवक तत्कालीन तलाठी (ग्राम महसूल अधिकारी)अविनाश मधुकर कोंडीग्रेकर, सजा सांगवडे ता. करवीर जि. कोल्हापूर सध्या रा. फ्लॅट नं.२०१ राजगौरव अपार्टमेट, टेंबलाईवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर मुळ रा. कोंडीग्रे ता. शिरोळ जि. कोल्हापूर तसेच कोतवाल सर्जेराव बंडा कुंभार सजा सांगवडे ता. करवीर जि. कोल्हापूर रा. कुंभार गल्ली, सांगवडे यांचेविरुध्द गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षीका आसमा मुल्ला, पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलिस नाईक सचिन पाटील, पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, चालक सहाय्यक पोलीस फौजदार गजानन कुराडे चालक पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे यांच्या पथकाने कारवाई केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!