नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भारतीय जैन संघटनेतर्फे साक्रीत कॅन्सर आजारावर जनजागृती

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाइम🚨प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री: भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथाजी यांच्या मार्गदर्शनाने खान्देश अध्यक्ष चंद्रकांत भाऊ डागा यांच्या प्रेरणेने खान्देश उपाध्यक्ष सौ. जोशीलाताई पगारिया आणि खान्देश सदस्य अजितकुमार टाटीया यांच्या नेतृत्वात भारतीय जैन युवा संघटनेतर्फे कॅन्सर जनजागृती दिवस साजरा करण्यात आला.
साक्री शहराचे भारतीय जैन संघटनेचे शहर अध्यक्ष विजयकुमार टाटीया आणि टीम यांच्या नियोजना नुसार साक्री शहरातील सुकमल हॉस्पिटल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॅन्सर आजारावर डॉ. आशिषकुमार भरतजी पगारिया यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे, म्हणून नगीनकुमार पगारिया, धुळे जिल्हा उपाध्यक्ष निखिलकुमार टाटीया उपस्थीत होते. प्रस्तावना शहर उपाध्यक्ष प्रतीक कुमार टाटीया यांनी केले
डॉ. आशिषजी पगारिया यांनी आपल्या भाषणात कॅन्सर विषयी जनजागृती करत युवकांना एक चांगला संदेश दिला आहे कि, आजच्या बदलत्या राहणीमानानुसार युवा आणि युवतींचे राहणीमान ही खूप बदलले आहे फास्ट फूड जास्त प्रमाणात वाढले आहे त्या मुळे आतड्यांचे आजार खूप होत आहे बिघडलेल्या जीवन शैली मुळे पोट, आतडे, अन्ननलिकेचे आजार खूप प्रमाणात उद्भवत आहे त्या साठी भरपूर प्रमाणात फळे, भाज्या गरम पाण्यात चांगले धुवून त्या खाव्यात
आजकाल युवा वर्ग खूप व्यसनाच्या आहारी जात आहे त्यामुळे ही कॅन्सर सारखे रोग प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्या साठी जनजागृती करायची खूप आवश्यकता आहे. वेळीच आपण व्यसनाला दुरावा केला तर आपले जीव वाचू शकणार भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून साक्री शहरात युवा टीम मार्फत कॅन्सर वर जनजागृती मोहीम हातात घेतल्या बद्दल साक्री BJS चे अभिनंदन करतो अश्या शुभेच्छा डॉ. आशिषजी पगारिया यांनी आपल्या भाषणाद्वारे दिल्या
सौ जोशीला पगारिया यांनी आपल्या भाषणात भारतीय जैन संघटनेच्या नैतृत्वात 4 फेब्रुवारी कॅन्सर दिवस भारतात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात,शहरात, गावात BJS च्या माध्यमाने पदाधिकारी मार्फत जनजागृती करण्यात आल्याचे सांगितले.
आभार शहर सचिव भूषण कोचर यांनी मानले. भारतीय जैन संघटना शहर अध्यक्ष विजयकुमार टाटीया, उपाध्यक्ष प्रतीककुमार टाटीया, सचिव भूषणकुमार कोचर, सचिव संयमकुमार पगारिया, केतन संचेती, विशाल पारख, आशिष टाटीया, हिमांशू कोचर, धीरज टाटीया, चेतन टाटीया, शेतकरी बांधव, रुग्ण आणि भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!