नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हिमायतनगर पोलिसांची पैनगंगा नदीच्या वाळू माफियांवर केले कडक कार्यवाही

DPT NEWS NETWORK 🗞️ 🚨 ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- प्रतिनिधी :- सतीश जिड्डेवार

नांदेड जिल्ह्यामध्ये वाळु माफीया कडुन अवैद्य मागनि वाळू उपसा व वाहतुक करून शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असल्याने मा.श्री. अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे. हद्दीत अवैद्य वाळु उपसा व वाहतुक संदभनि कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने दि.11/02/2025 रोजी हिमायतनगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना रात्री 02.10 वाजेच्या सुमारास गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, दिघी ता. हिमायतनगर शिवारालगत, पैनगंगा नदी पात्रामध्ये एक निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली वाळुने भरुन चोरटी वाहतुक करीत असलेबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने आम्ही रात्री 02.25 वा. चे सुमारास नमुद ठिकाणी जाऊन पहाणी केली असता नमुद ट्रॅक्टरमध्ये दाजे एक ब्रास वाळु भरलेली दिसुन आली. म्हणुन नमुद आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमुद गुन्ह्यात एक निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर क्र. MH-29-AQ-2876 व लाल रंगाची ट्रॉली कि.अं.5,00,000/- रु.) व अंदाजे एक ब्रास वाळु कि.अं.05,000/- रु. अशी एकूण 05,05,000/- रु. ची मालमत्ता जप्त करण्यात आली असुन पो.स्टे. हिमायतनगरचे सपोउपनि जाधव यांचे फिर्याद वरुन हिमायतनगर पोलीस ठाणे येथे वर प्रमाणे आरोपी 1) गजानन श्रीराम माने, 37 वर्ष, धंदा चालक, रा.ठि. बोरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ 2) नारायण कोडबा माने, 62 वर्ष, मालक, रा.ठि. बोरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बिट पोहवा/2204, पाटील हे करीत आहेत. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून मा. वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.
या व अशा अनेक अवैध धंद्यावरती कार्यवाहींची आशा हिमायतनगर वासिया कडून होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:30 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!