नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राजारामपुरी पोलीस ठाणेकडुन गांजा विक्री करणाऱ्यास मुद्देमालासह अटक – गुन्हे शोध पथकाची कारवाई

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी :- संजय दिंडे

कोल्हापूर:- राजारामपुरी पोलीस ठाणेच्या हद्दीत गांजा विक्री करणाऱ्यास मुद्देमालासह पकडण्यात आले.
गुन्हे शोध पथकाचे अमोल पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहिती अशी की. राजारामपुरी १ ली गल्ली, जनता बझार जवळ
येथे आरोपी गांजा विक्री करत असल्याचे समजताच सहाय्यक फौजदार समीर शेख यांनी राजारामपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना कळविले. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे व अंमलदार यांनी मिळाले बातमीचे ठिकाणी जावुन छापा कारवाई करुन आरोपी आकाश सुनिल रेणके वय वर्षे 33, राहणार 2071, ई वॉर्ड, राजारामपुरी 12 वी गल्ली, सध्या रा. संचयनी पार्क, राजारामपुरी 9 वी गल्ली, कोल्हापूर यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली त्याचे ताब्यात असलेला 28,750 रुपये किंमतीचा 1 किलो 150 ग्रॅमचा गांजा .अंमली पदार्थ व 6000 हजार रुपये किमतीची एक स्काय ब्ल्यु रंगाचा vivo कंपनीचा मोबाईल असा एकुण 34,750 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.आरोपीस ताब्यात घेवुन राजारामपुरी पोलीस ठाणे मध्ये गु.र.नं. 101/2025 गुगींकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1958 चे कलम 8(क), 20(ब) (ii) (अ) प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!