नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वन्यप्राणी शिकार प्रकरणी मौ. चंदगड येथील आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव (संरक्षण) १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल.

DPT NEWS NETWORK 🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी:- संदीप सकट

कोल्हापूर:- रोजी चंदगड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वनपरिमंडळ चंदगड येथील मौ. चंदगड जंगल कक्ष क्र. ३ मध्ये वनपाल चंदगड श्री. कृष्णा डेळेकर, वनरक्षक श्री. सागर कोळी व श्री. आकाश मानवतकर, वनसेवक श्री. नितीन नाईक, व वन्यजीव बचाव पथकातील सदस्य हे पायी फिरती (गस्त) करत असताना सर्वसाधारण सायंकाळी ०५.०० वाजेच्या दरम्यान अनोळखी दोन इसम शिकारीचे हेतूने बक-याचे चारट (चरबी) लावलेले स्फोटक गोळे जंगलक्षेत्रातील जाणाऱ्या पायवाटेवर ठिकठिकाणी वेग-वेगळ्या दिशेने ठेवत असता दिसुन आल्याने वनपरिक्षेत्र चंदगड कडील अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत सदर ठिकाणची तपासणी केली असता शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना दिसुन आले. मौका स्थळी आरोपींची तपासणी केली असता आरोपीं कडुन ठेवलेले व त्यांचेकडील एकुण स्फोटक गोळे नग संख्या-१००, निळ्या रंगाची कापडी पिशवी १ नग, निळ्या रंगाची प्लॅस्टिक पिशवी १ नग, मोबाईल नग-०२, वाहन मोटार सायकल-०१ (KA14EW 5364) इत्यादी मुद्देमाल जागेवर जप्त करणेत आला आहे. सदर प्रकरणी आरोपी संख्या २ अनुक्रमे आरोपी क्र. ०१ श्री. जेमीनी मंजु रजपुत रा. हक्किपक्की कॅम्प, होसुडी, सदाशिवपुरा ता.जि. शिमोगा (कर्नाटक) व आरोपी क्र.०२ श्री. मंजुनाथ धरम रजपुत रा. हक्किपक्की कॅम्प, होसुडी, सदाशिवपुरा ता.जि. शिमोगा (कर्नाटक) यांचे विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ कायद्याच्या २(१६), ९,३२,३९,५० व ५१ भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) डी, आय, नुसार वनरक्षक चंदगड यांनी त्यांचे कडील प्र.गु.रि.क्र.WL-०१/२०२५ दि.१०/०२/२०२५ अन्वये वनगुन्हा नोंद करुन आरोपींना दि.११/०२/२०२५ रोजी रितसर अटक करुन त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चंदगड यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना ०३ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

सदर गुन्हयाचा तपास श्री.जी. गुरुप्रसाद, उप वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापुर, नवनाथ कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक (खा.कु.तो व वन्यजीव) यांचे मार्गदशनाखाली नं. पां. भोसले, वनक्षेत्रपाल चंदगड, कृष्णा डेळेकर, वनपाल चंदगड, वनरक्षक सागर कोळी, वनरक्षक

आकाश मानवतकर तसेच वनपरिक्षेत्र चंदगडकडील सर्व कर्मचारी व वन्यजीव बचाव पथक, चंदगड यांनी कारवाई केली. तसेच सदर गुन्हा प्रकरणी पुढील सखोल तपास सुरु आहे.

वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व जैवविविधतेचे जतन करणे आवश्यक असुन वन्यप्राण्यांचे अवैद्य शिकार व अवैद्य वृक्षतोड अवैद्य अतिक्रमण होत असेल तर तात्काळ परिक्षेत्र वनअधिकारी यांचे कार्यालय चंदगड अथवा वनविभाग कोल्हापुर कडे माहिती देणेत यावी आपले नांव गोपनीय ठेवणेत येईल.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:59 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!