नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

विना परवाना गावठी पिस्टल बाळगणारा जेरबंद व मुद्देमाल जप्त- शिरोळ पोलिसांची मोठी कारवाई

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- सचिन कोळी

शिरोळ:- दिनांक ११/०२/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की अटकेत असलेला आरोपी अमोल खडके, रा. शिरोळ याचेकडे विनापरवाना गावठी पिस्टल असून तो ते स्वतः जवळ बाळगतो. गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी शिरोळ गावचे हददीत घालवाड फाटा येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आय. बी. मुल्ला, पोलिस हेड कॉंन्सटेबल बाबाचाँद पटेल,पोलिस कॉंन्सटेबल रहिमान शेख, पोलिस कॉंन्सटेबल युवराज खरात, पोलिस कॉंन्सटेबल सुशांत ठोंबरे, पोलिस हेड कॉंन्सटेबल दिलीप कुंभार, पोलिस हेड कॉंन्सटेबल मनोज मडीवाळ, पोलिस कॉन्स्टेबल ओंबासे शिरोळ पोलीस ठाणे यांनी शिरोळ घालवाड फाटा येथे जावून छापा कारवाई केली. त्यावेळी आरोपी अमोल शंकर खडके, वय २८ वर्षे, रा. खडके मळा, सरकारी आय टी आय जवळ, शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर .अमोल खडके याच्या कमरेला पॅन्टमध्ये खुपसलेली गावठी पिस्टल मिळून आली. गावठी पिस्टल बाबत त्याचेकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्याचेकडे हत्यार परवाना आहे का याबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले आहे. त्याचेकडे मिळून आलेले एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आली .एक गावठी पिस्टल मेटल बॉडीची, त्यास बॅरल, हॅमर, ट्रिगर असलेली, पिस्टल ग्रिपवर दोन्ही बाजूस काळ्या रंगाचे फायबर असलेली व मॅगझिन नसलेली. जुनी वापरती हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल नंबर MH08P0634 असा असलेली जुनी वापरती किंमत असा ६५,००० रुपये किमतीचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आले. त्याचेविरुध्द शिरोळ पोलीस ठाणे गु. र. नं. ५४/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, जयसिंगपूर यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला हे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:49 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!