DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री: साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) येथील छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दि.१४ फेब्रुवारी बुधवारी रोजी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अनिल सोनवणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे होते.या कार्यक्रमासाठी विश्वस्त दिपक अहिरराव, संजू पाटील, उत्तमराव बोरसे, ऍडव्होकेट मोहन साळुंके, शेवाळी गावाच्या सरपंच सौ. सुरेखाताई साळुंके,उपसरपंच केतन साळुंके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दगाजी साळुंके, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जितेंद्र नांद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाला सुरुवात सर्व दिवंगत विश्वस्तांच्या प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर कुंडीतील रोपट्यांना पाणी घालून भैय्यासाहेब अनिल सोनवणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाच्या शिक्षिका प्रणाली खैरनार यांनी व त्यांच्या गीतचमूने स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यालयाचे शिक्षक रिजवान अली सैय्यद यांनी अतिथींचा परिचय करून दिला व सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते “मन रतन” या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. बक्षीस यादीचे वाचन जी .एस. रामोळे यांनी केले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व गावाचे सुपुत्र कायदेतज्ज्ञ ॲड. मोहन साळुंके यांनी शिस्त आणि कठोर मेहनतीशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला तसेच विकास शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना सतत परिश्रम करून जीवनात यशस्वी होण्याचा सल्ला दिला. शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व संस्थेचे सेक्रेटरी भैय्यासाहेब अनिल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना आज व्यासपीठावर जे प्रमुख अतिथी म्हणून विराजमान आहेत ते एकेकाळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते अशा प्रेरणादायी व्यक्तीकडून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक नाना मारनर, किरण नांद्रे, सचिन बोरसे, अमोल देसले, भावना भदाणे,राणी चव्हाण प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षदा साळुंके व सर्व शिक्षिका या सर्वांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. ए. सैय्यद व जी एस रामोळे यांनी केले. मुख्याध्यापिका सुनीता नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



