DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड
कोल्हापुर:- चंदगड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी विश्वास पाटील, पोलीस निरीक्षक यांनी गोवा बनावटीच्या दारुची विक्री व वाहतुक करणारे दारू विक्रेत्यावर कारवाई करणेकरीता चंदगड पोलीस ठाणेकडील पोलीस पथक तयार केले आहे. अवैध धंद्यावर कारवाई करणेकरीता सरकारी वाहनाने पोलीस ठाणे हद्दीत रवाना झाले, पेट्रोलिंग दरम्यान मा. विश्वास पाटील पोलीस निरीक्षक यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बेळगांव वेगुर्ला रोडवरुन एक इसम सिल्व्हर रंगाची इनोव्हा कारमधुन गोवा बनावटीचे दारुची वाहतुक करणार आहे अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे वरील पोलीस स्टाफ बेळगांव वेगुर्ला जाणारे रोडवरील जाणारे वाहनावर वॉच करीत असताना मिळाले बातमीप्रमाणे वेगुर्ला गावाकडुन बेळगांव गावाकडे एक संशयित सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार नंबर एमएच 04 डी वाय 0654 ही भरधाव येत असलेली दिसली. पोलीसांनी हाताने थांबण्याबाबत इशारा केला असता इनोव्हा कार चालकांने वाहन न थांबविता तसेच पुढे भरधाव वेगात निघुन गेला त्याचा पोलीसांनी कानुद खुर्द, नागनवाडी फाटा, अडकुर ते विंझणे असा सरकारी वाहनाने पाठलाग केला असता अज्ञात आरोपी चालकांने त्यांचे ताब्यातील इनोव्हा कार विंझणे गावचे हद्दीत रोडकडेला सोडुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला आहे. पोलीसांनी इनोव्हा कारची तपासणी केली असता कारचे मागील बाजुस वेगवेगळ्या कंपनीच्या गोवा बनावटीच्या 5,12,400 रुपये किंमतीच्या सिलबंद दारुच्या बाटल्या व इनोव्हा कार असा एकुण 14,12,400 रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.
छापा कारवाईवेळी मिळून आलेल्या इनोव्हा कारचा मालक व अज्ञात चालक आरोपीचा शोध घेणेकरीता चंदगड पोलीस ठाणेकडील विशेष तपास पथक स्थापण केले असुन त्यांचा शोध सुरु आहे. पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुध्द चंदगड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा व मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलिस हवालदार तुकाराम राजीगरे, पोलिस हवालदार सुनिल माळी, ईश्वर नावलगी, पोलिस शिपाई नितीन पाटील, पोलिस शिपाई आशितोष शिऊडकर चंदगड पोलीस ठाणे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शितल धविले या करीत आहेत.



