नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चोरट्यांनी नागपुरातील ५५ दुचाकी केले लंपास, तुमसर येथील दुचाकी दुरुस्ती केंद्रात मॉडीफाय करत विक्रीचा चालत होता काळा धंदा

DPT NEWS NETWORK 🗞️

🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 🗞️✍️✍️ प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

तुमसर : महाराष्ट्रात मोठ मोठ्या शहरात वाहन चोरीचे रॅकेट जोरात चालतात त्यात पोलीसही इमाने ईदबारी कारवाई करत चोरांना वाहनासह अटक करतात. असाच काही प्रकार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे घडला. नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणांहून दुचाकींची चोरी करून त्यांना तुमसर येथील एका दुचाकी दुरुस्ती केंद्रात आणले जायचे. त्यानंतर दुचाकींना मॉडिफाइड करून त्यांची विक्री केली जात होती. नागपूर येथील मेट्रो स्थानकावर दुचाकी चोरी करताना चोरट्यांना नागपूर क्राइम ब्रांच युनिट फाईव्हच्या पथकाने रंगेहात पकडले. तुमसर येथून चोरीच्या सुमारे ४० ते ५० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे स्थानक व गर्दीच्या स्थळावरून दुचाकी वाहन चोरी करणारी टोळी नागपूर शहरात सक्रिय होती. नागपूर क्राइम ब्रांच क्रमांक पाच मधील पथकाचा या टोळीवर बारीक नजर होतीच. तीन दिवसांपूर्वी एका रेल्वे स्थानकात चोरटे वाहन चोरण्याच्या प्रयत्नात असतानाच नागपूर क्राइम ब्रांचच्या पथकाने त्यांना अटक केली.
तुमसर शहरातील तहसील कार्यालयाजवळ एक दुचाकी दुरुस्ती केंद्र आहे. चोरटे दुचाकी चोरी करून या दुरुस्ती केंद्रात आणायचे. त्या वाहनांना मॉडिफाय करून दुसरा रंग दिला जायचा. त्यानंतर विक्री केली जात होती. तपासात नागपूर पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.

*चोरटे तुमसर तालुक्यातील*

गोबरवाही परिसरातील दोन पेक्षा अधिक चोरट्यांच्या त्यात समावेश आहे. नागपूर क्राईम ब्रँचचे पथक तुमसर येथे दोन दिवसापूर्वी आले होते. त्यांनी तपासात चोरट्यांकडून माहिती वदवून घेत ४० वाहने जप्त केली. असून पुन्हा १० ते १५ दुचाकी जप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या चोरट्यांनी नागपूर शहर व कामठी तसेच इतर शहरातदेखील दुचाकी चोरल्याची माहिती आहे. पोलिस तपासात नेमका आकडा पुढे येणार आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:07 am, April 20, 2026
37°C
छितरे हुए बादल
20 %
7 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Clouds: 36%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!