नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे तालुका पोलीसांची कामगिरी

पाण्याच्या मोटर चोरास मुद्देमालासह केले जेरबंद, 44500/- रुपयाचा माल केला हस्तगत

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संदीप अहिरे

धुळे:- दिनांक-23/02/2025 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास तक्रारदार सुजित दिपक पाटील वय-31 व्यवसाय-शेती रा. शिरुड ता. जि. धुळे यांच्या धामणगांव शिवारातील विहीरीतील पाण्याची मोटार कोणीतरी अज्ञात व्यक्तिने चोरी करुन घेवून गेला म्हणुन त्यांच्या तक्रारीवरुन अपराध क्रमांक-121/2025 भारतीय न्यायसंहिता कलम-303 प्रमाणे गुन्हयाची नोंद झाली आहे.

नमुद घटनेची माहिती प्राप्त होताच पोनि अभिषेक पाटील, यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि गुन्हयाचे गांभीर्य लक्षांत घेवून अधिनस्त असलेले पोउनि कृष्णा पाटील, पोहवा-प्रकाश सोनवणे, पोहवा-ललित खळगे, पोहवा-मनोज शिरसाठ, पोहवा-कुणाल पानपाटील, पोहवा-उमेश पवार, पोकॉ-विशाल पाटील, यांना गुन्हयाची माहिती सांगून गुन्हयातील अज्ञात चोरटयाची माहिती काढण्याच्या सुचना करुन मा.पोलीस अधीक्षक, धुळे श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप-विभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांना घटनेची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनपर सुचनेप्रमाणे तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून प्रकरणाच्या तपासाला गती देवून तपास पथकाने यातील संशयीत आरोपी सुनिल भगवान भोई वय-28 रा. शिरुड ता. जि. धुळे यांस ताब्यात घेवून विचारपूस केली त्यात त्याने सदर गुन्हयाची कबुली देवून गुन्हयातील तक्रारदार सुजित पाटील यांची चोरी केलेली विजेची पाण्याची मोटार काढून देवून त्याने यापुर्वी इतर ठिकाणाहून देखील चोरी केलेल्या विजेच्या मोटारी डिगंबर शेनपडू चव्हाण वय-44 रा. शिरुड ता.जि. धुळे यांस विकल्याची माहिती दिली त्यावरुन पोलीसांनी आरोपी डिगंबर चव्हाण यालाही अटक करुन त्याचे कब्जातून 4 मोटारी हस्तगत केल्या असुन या प्रकरणांत एकुण 44500/-रुपये किंमतीच्या एकुण 5 विजेच्या मोटारी पोलीसांनी जप्त केल्या आहेत. नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोहवा-प्रकाश सोनवणे धुळे तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!