नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री; सर्वर डाऊन च्या अडचणीमुळे, 27 गावातील लाखों रेशन ग्राहक रेशनिंग पासून वंचित..

वारंवार सर्वर डाऊन अडचणींमुळे धान्यसाठा निर्धारित वेळेत पोहचविण्यास विलंब केल्याने साक्री तालुक्यातील 27 गावातील लाखों रेशन ग्राहक डिसेंबर 2024 महिन्यात रेशनिंग पासून राहिले वंचित

DPT NEWS NETWORK 🗞️ 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाइम 🚨 प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री: रेशन धान्य दुकानांत उशिरा झालेला धान्यपुरवठा तसेच ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबर 2024 चे धान्य वितरण रखडले आहे. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांतील सुमारे २४ लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेले नाही. धुळे जिल्ह्यातील 987 पैकी 766 रास्त धान्य दुकानांत धान्य साठा पोहचला तर उर्वरित 221 रास्त धान्य दुकानांवर वेळेवर धान्य साठा पोहचला नाही व तसेच वारंवार सर्वरला येणाऱ्या अडचणींमुळे धुळे जिल्ह्यातील 221 रास्त दुकानांत त्यात साक्री तालुक्यातील 27 गावांचा समावेश असून डिसेंबर 2024 महिन्याचे धान्य रेशन ग्राहकांना भेटले नसून याचा फटका लाखों रेशन ग्राहकांना बसला असुन अशा या रेशनापासून वंचित राहिलेल्या लाखों रेशन ग्राहकांनसाठी शासनाने मुदतवाढ द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीची दखल घेत साक्री तालुका पुरवठा विभाग व धुळे जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास पत्र व्यवहार करण्यात आला आहे त्या पत्र व्यवहारात असे नमूद करण्यात आले आहे की, धुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून धुळे जिल्ह्यात माहे डिसेंबर-2024 ची उचल FCI मनमाड येथून सुरु होती. तथापि हमालांची कमतरता असल्यामुळे मुदतीत FCI कडून 100% उचल मिळाली नाही. करिता माहे डिसेंबर-2024 उचल पूर्ण करणेकमी नापु 22 मंत्रालय, मुंबई याच्यांकडेस ‌द्वितीय मुदत वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
तसेच माहे डिसेंबर-2024 चे epos वर वाटप करण्याची सुविधा दि. 07 डिसेंबर-2024 पासून उपलब्ध झाली होती. परंतू वारंवार सर्वर अडचणी येत असल्यामुळे देखील वाटप गतीने होऊ शकले नाही.

माहे डिसेंबर-2024 चे धान्य साठा आजअखेर 987 पैकी 766 रास्त भाव दुकानांना पोहचलेला आहे. उर्वरित 221 रास्त भाव दुकानांना मुदत वाढ प्राप्त झाल्यानंतर धान्य साठा पोहच करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. आज अखेर epos दवारे 52% लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे. करिता माहे डिसेंबर-2024 च्या उर्वरित अन्न-धान्य लाभार्थ्यांना वाटपासाठी epos मशीन वर दि 31.01.2025 पर्यंत मुदत वाढ मिळण्यास विनंती.

प्रशासनाने डिसेंबर महिन्यात वंचित राहिलेल्या लाखों रेशन ग्राहकांच्या मागणीची दखल घेत त्या मागणीची पूर्तता करावी, डिसेंबर महिन्यांचे धान्य वितरीत करण्यासाठी मुदत वाढ देवून त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी अपेक्षा सामान्य जनता व्यक्त करित आहेत.

डिसेंबर २०२४ महिन्याच्या अन्न-धान्य वाटपासाठी ई-पॉस मशीन वर मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास पत्र व्यवहार करण्यात आला आहे :- जिल्हा(धुळे )पुरवठा अधिकारी महेश शेलार

साक्री तालुक्यातील 27 गावातील रेशन ग्राहकांना त्यांच्या हक्काचे डिसेंबर 2024 महिन्यांचे धान्यसाठा मिळावा यासाठी मुदतवाढ द्यावी असा शासनास प्रस्ताव पाठविणार :- तहसिलदार (साक्री) साहेबराव सोनवणे

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!