नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आगग्रस्त परिवारास इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडारा कडून तत्काल साहित्याची मदत

( महेश गिरीपुंजे पोलीस शिहोरा, मच्छिंद्र राऊत, बंडू चौधरी, राकेश हिंगे यांनी आगीवर नियंत्रण केले. म्हणून त्यांचे कौतुकही करण्यात आले.)

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाइम 🚨

प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

तुमसर:- जागृत हनुमान मंदिर चांदपूर च्या पायथ्याशी बसलेल्या गावात धार्मिक उत्सवानिमित्त गावातील सगळे नागरिक एकत्रित झाले असताना अचानक दिवाकर नामदेव चोपकर व संजय नामदेव चोपकर यांच्या घराला आग लागली. आगीचे रोद्र रूप पाहून गाव भयभीत झाले. रात्रीची वेळ असल्यामुळे कुणालाही यावर ताबडतोब नियंत्रण आणता आले नाही.परंतु धार्मिक स्थळावर तैनात असलेले सिहोरा पोलीस स्टेशनचे शिपाई महेश गिरीपुंजे यांचे सोबत गावातील दक्ष नागरिक राकेश हिंगे, मच्छिंद्र राऊत, बंडू चौधरी इत्यादीने जीवावर उद्धार होऊन घरातील सिलेंडर बाहेर काढले व मोठा अनर्थ टळला? रुद्र रूप धारण केलेल्या आगीवर पाण्याचा वर्षांव करत आगीवर नियंत्रण आणले.
चोपकर परिवाराचे कौलारू घर क्षणात जळून राख झाले यात अन्न धान्यासह कपडे आणि इतर मौल्यवान वस्तू भयानक आगीमुळे जळून खाक झाल्या. व होत्याचे नव्हते झाले?
संयुक्त कुटुंब असलेल्या चोपकर परिवारावर अचानक आलेल्या संकटातून थोडा दिलासा मिळावा म्हणून सूचना मिळताच इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडाराचे सेक्रेटरी डॉक्टर नितीन तुरसकर यांचे हस्ते सरपंच वसंत धार्मिक, उपसरपंच सरिता उके, ग्रामसेवक राकेश वैद्य व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत आगग्रस्त चोपकर परिवारास मदत साहित्याची किट देण्यात आली. याप्रसंगी श्रीमती मीरा भट्ट, राजू खवसकर, डॉक्टर रुद्रसेन भजनकर, सौ. मीनल लिमजे,आचल मेश्राम आजीवन सदस्य रेडक्रॉस हजर होते.
तसेच सोबत दिनेश गजभिये, उमेश तुरकर, सह विजय तितरमारे विनोद नेवारे, गौरीशंकर चौधरी, श्रावण कांबळे, देवचंद चचाने,सोनू शेंडे, राजू चोपकर, शेखर भोयर पत्रकार इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!