नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूरात तलवारी विक्री करणाऱ्यास मुद्देमालासह अटक – राजारामपुरी पोलिस ठाणेची मोठी कारवाई

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- संजय दिंडे

कोल्हापूर: राजारामपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की राहुल संतोष घोलप, राहणार दत्त मंदिर जवळ, राजेंद्रनगर हा स्वतःचे घरी तलवारी सारखी घातक हत्यारे आणुन ठेवतो व काही दिवसानंतर ती हत्यारे विकत असतो. त्याने तलवारी आणुन त्याने त्याचे राहते घरी ठेवलेली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले ठिकाणी जावुन खात्री करुन छापा कारवाई करणेबाबत आदेश मिळताच राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे बातमीचे ठिकाणी गेले असता राहुल संतोष घोलप याचे राहते घराचे दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी जिन्याचे जवळ आडगळीमध्ये गोणपाटात बांधुन ठेवलेल्या १७,४०० रुपये किंमतीच्या धारधार घातक १० तलवारी मिळुन आल्यानंतर संतोष घोलप याला ताब्यात घेण्यात आले. राजारामपुरी पोलिस ठाणेचे पोलिस कॉन्सटेबल विशाल शिरगांवकर यांनी फिर्याद दिलेने त्यांच्यावर गु.र.नं.६९६/२०४ भारतीय हत्यार कायदा कलम ५,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!