DPT NEWS NETWORK 🗞️🗞️✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- योगेश गवळे
नाशिक:- सन २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा पाटी ( हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) ३० एप्रिल पूर्वी बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र परिवहन विभागातर्फे यासाठी देशात सर्वाधिक दर असणाऱ्या तीन कंपन्यांना टेंडर देण्यात आले आहे. त्यामुळे इतर राज्यातील दर यामधे खूप मोठा तफावत आहे. त्यामुळे वाहनधारकांची होणारी लूट थांबवावी. देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले आहे. तेव्हा पासून नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबर प्लेट उपलब्ध होतात. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार करण्यात आली आहे. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. तसेच २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना देखील परिवहन विभागाने उच्च सुरक्षा पाटी ( एचएसआरपी) बंधनकारक केले आहे.त्यानुसार ३० एप्रिल पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घ्यावी लागणार आहे. परंतु ज्या कंपन्यांकडून हे नंबर प्लेट बसविण्यात येणार आहे. त्यांना वाढीव दराने टेंडर दिल्याने त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.
*राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे काम तीन कंपन्यांना दिले आहे.महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यात एचएसआरपी बसविण्याचे दर खूपच कमी आहेत.*
*अशी आहेत दर आकारणी*
🏍️
महाराष्ट्र ………………. ४५०
आंध्र प्रदेश……… २४४
गुजरात…….. १६०
झारखंड………. ३००
गोवा…… १५५
🛺
महाराष्ट्र……………. ५००
आंध्र प्रदेश…….. २८२
गुजरात…… २००
झारखंड……… ३४०
गोवा….. १५५
🚘
महाराष्ट्र…………………७४५
आंध्र प्रदेश…………. ६१९
गुजरात……… ४६०
झारखंड………. ५४०
गोवा…… २०३
🚚
महाराष्ट्र………………. ७४५
आंध्र प्रदेश………… ६४९
गुजरात………… ४८०
झारखंड…………. ५७०
गोवा…… २३२
*राज्यात दुप्पट दर आकारणी वाहनांना उच्च सुरक्षा पाटी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची मुदत ३० एप्रिल आहे. यामुळे वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवून घेण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु राज्यातील नंबर प्लेट बसविण्यासाठी आकारण्यात येणारी फी ही गोवा, गुजरात व इतर राज्यांपेक्षा दुप्पट आहे याचा फटका थेट वाहनधारकांना बसत आहे.*

भूपेंद्र बागुल
ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष



