नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रेती घाटावर भंडारा पोलीस अधीक्षकांची धाड कोट्यावधीचं मुद्देमाल जप्त

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🗞️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

तुमसर:- तुमसर तालुक्यामध्ये तामसवाडी रेती घाटावर भंडारा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात धाड घालण्यात आली त्या धाडीत तीन कोटी 50 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनाचे चालक-मालक हे पळालेअसून त्यांचा शोध पोलि घेत आहेत. दिनांक 26 2 2025 रात्री नऊ वाजता ही धाड घालण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोते व अन्य पोलीस कर्मचारी सहीत तुमसर तालुका वैनगंगा नदीच्या पात्रात तामसवाडी घाटवर धाड घालून तीन कोटी पन्नास लाख रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. ह्यामध्ये 11 टिप्पर एक ट्रॅक्टर एक जेसीपी चा समावेश आहे वाहन चालक आणि मालक यांनी वाहन सोडून विरुद्ध दिशेने पळ काढला. कलम 303 49 3(2) भारतीय न्याय संहिता सहकलम 48 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत करीत आहेत. रेती चोरी करण्याची एवढी हिम्मत दाखवतात तर ह्या लोकांना अभय कुणाचा असा प्रश्न आम जनतेला पडला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:00 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!